CM Bhagwant Mann and CM Arvind Kejriwal ANI
देश

'मला तुमचा अभिमान' मंत्र्यांच्या अटकेनंतर केजरीवालांनी केले मुख्यमंत्री मान यांचे कौतुक

आप सरकार भ्रष्टाचाराला थारा दोणार नाही, मुख्यमंत्री भगवंत मान

दैनिक गोमन्तक

Vijay Singla Arrested: पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची आज मंगळवारी पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आप सरकार भ्रष्टाचाराला थारा दोणार नाही.

मान यांच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. मान कापली जाईल पण भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. आम्हाला तुझा अभिमान आहे प्रभु . भ्रष्टाचार हा देशाचा गद्दार आहे.आम्ही जे केले त्यासाठी धैर्याची गरज आहे. भ्रष्टाचाराशिवाय पक्ष चालू शकतो हे आप पक्षाने पुन्हा एका सिद्ध केले आहे.'

सीएम केजरीवाल पुढे म्हणाले, "जर आमच्याच कोणी चोरी केली तर आम्ही त्याला सोडणार नाही. आतापर्यंत सर्वच पक्षांनी आपापसात सेटींग केल्याचे दिसून येत होते, आपल्या प्रियजनांना पकडणे तर दूरच, एकमेकांच्या नेत्यांवरही कारवाई केली नाही. कोणत तरी पक्ष आपल्याच लोकांच्या भ्रष्टाचारावर कारवाई करत असल्याचे प्रथमच घडत आहे. भगवंत मान यांच्या निर्णयाने लोक खूप खूश आहेत, कोणतेही सरकार इतके प्रामाणिक असू शकते यावर जनतेचा विश्वास बसत नाही."

विजय सिंगला हे मनसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पंजाबी गायक आणि काँग्रेसचे उमेदवार शुभदीप सिंग सिद्धू यांचा पराभव केला. सिंगला हे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. सिंगला यांना पदावरून हटवताना भगवंत मान म्हणाले की, सिंगला यांनी त्यांच्या विभागाच्या निविदा आणि खरेदीत एक टक्का कमिशन मागितल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब सरकारने हा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT