priyanka gandhi nda criticism Dainik Gomantak
देश

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

priyanka gandhi nda criticism: मतदारयाद्या फेरपडताळणीच्या नावाखाली सुमारे ६५ लाख लोकांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली आहेत

गोमंतक ऑनलाईन टीम

बेतिया: ‘‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) बिहारमध्ये मत चोरी करून पुन्हा सत्तेत येऊ पाहत आहे. मतदारयाद्या फेरपडताळणीच्या नावाखाली सुमारे ६५ लाख लोकांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली आहेत,’’ असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी यांनी बुधवारी बिहारमधील पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील सभांमध्ये बोलताना केला.

प्रियांका यांनी पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकी नगर आणि चनपटिया येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केले.

‘‘आज देशातली परिस्थिती ही ब्रिटिश राजवटीसारखी झाली आहे. भविष्यात या देशात निवडणुका होतील की नाही, याबाबतही शंका वाटते,’’ असे प्रियांका यावेळी म्हणाल्या. राहुल गांधी यांनी हरियानामधील मतचोरीबाबतची माहिती दिला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. एनडीए सर्व नष्ट करत असताना तुम्ही शांत का? या लोकांना सत्तेतून खाली खेचा, असे प्रियांका म्हणाल्या.

महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित

प्रियांका यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. ‘‘मोदी हे गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि तरुणांचे शिक्षण यांबाबतच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष न देता, काँग्रेसच्या छायाचित्रामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा फोटो नाही, याकडे अधिक लक्ष देतात. पण स्वतःच्या सभांमध्ये मात्र ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत उभेही करत नाहीत,’’ असा आरोप प्रियांका यांनी केला.

प्रियांका म्हणाल्या, ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास राज्यातील नागरिकांना २५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा देणार. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्व कारखाने गुजरातमध्येच उभे करत असून, त्यांचे बिहारकडे दुर्लक्ष होत आहे

बिहारमधील शेतकरी हा कर आणि शेतीवरील वाढत्या खर्चामुळे त्याचे उत्पन्न वाढवू शकत नाहीये ‘‘मोदींच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळत नाही मात्र उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास प्रत्येक गरीब कुटुंबाला घर किंवा साडेतीन जमीन देणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

SCROLL FOR NEXT