Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

65 Bengal Cricketers Banned in Age Fraud: बंगाल क्रिकेट असोसिएशनने वयातील गैरप्रकार आणि बनावट कागदपत्रांच्या विरोधात आजवरची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली.
65 Bengal Cricketers Banned in Age Fraud
65 Bengal Cricketers Banned in Age FraudDainik Gomantak
Published on
Updated on

65 Bengal Cricketers Banned in Age Fraud: बंगाल क्रिकेट असोसिएशनने वयातील गैरप्रकार आणि बनावट कागदपत्रांच्या विरोधात आजवरची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली. अधिकृत तपासांती सीएबीने तब्बल 65 खेळाडूंचे नोंदणी आणि क्लब ट्रान्सफर रद्द करत त्यांच्यावर बंदी घातली. या निर्णयामुळे हे सर्व 65 क्रिकेटपटू आगामी दोन देशांतर्गत हंगाम म्हणजे 2026-27 आणि 2027-28 मध्ये कोणत्याही अधिकृत स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. या कारवाईमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात आणि विशेषतः युवा खेळाडूंमध्ये मोठी खळबळ उडाली.

कारवाई झालेल्या खेळाडूंमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केलेल्या 12 प्रमुख क्रिकेटपटूंचा समावेश आहे, ज्यांच्या जन्मदाखल्यात आणि अधिकृत नोंदींमध्ये फरक आढळून आला. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक नाव म्हणजे भारताला (India) 2022 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज रवी कुमार. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध 4 बळी घेणाऱ्या रवी कुमारच्या जन्म प्रमाणपत्रात तब्बल 45 महिन्यांचा फरक आढळून आला. या फसवणुकीमुळे 2021-22 ते 2025-26 या कालावधीत अंडर-19, अंडर-23 आणि सीनियर टीममधील त्याचा सहभाग बेकायदेशीर ठरवण्यात आला.

65 Bengal Cricketers Banned in Age Fraud
Rohit Sharma TV Debut: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

रवी कुमारव्यतिरिक्त भारताच्या अंडर-19 संघात नुकतीच निवड झालेल्या रोहित यादव या लेग स्पिनरवरही बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली. रोहितच्या कागदपत्रांमध्ये सव्वादोन वर्षांची गडबड पकडली गेली. सीएबीच्या या यादीतील इतर खेळाडूंचे रेकॉर्ड अत्यंत धक्कादायक आहेत. अरुण कुमार चौरसियाच्या वयात तब्बल 115 महिने म्हणजेच साडेनऊ वर्षांपेक्षा जास्त फरक आढळला, तर महिपाल यादवच्या वयात 8 वर्षांचा झोल समोर आला. याशिवाय प्रभात मौर्य, अमृत राज उपाध्याय, दिलशाद खान आणि अनुभव त्यागी यांसारख्या खेळाडूंचाही या फ्रॉड यादीत समावेश आहे.

65 Bengal Cricketers Banned in Age Fraud
Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

क्रिकेटमधील हा 10 वर्षांचा बनावटपणा रोखण्यासाठी बीसीसीआयने सर्व राज्य क्रिकेट मंडळांना अलर्ट जारी केला असून असा गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध आता झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com