Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Rape on Promise of Marriage Goa: सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपातून हनुमंत राठोड याची दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
Rape on Promise of Marriage Goa
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: विवाहाचे वचन देऊन बलात्कार तसेच १८ लाख रुपये व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपातून हनुमंत राठोड याची दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली.

या प्रकरणात २९ वर्षीय पीडितेने झुआरीनगर, सांकवाळ येथील राठोडविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, राठोडने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, तिच्याकडील अंदाजे १८ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने त्याने उसने घेतले होते. त्यानंतर ही रक्कम व दागिने परत करण्यास तसेच तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

Rape on Promise of Marriage Goa
Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

या तक्रारीच्या आधारे वेर्णा पोलिसांनी संशयित राठोडविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने संशयिताविरोधात ठोस पुरावे नसल्याने आरोपांतून निर्दोष सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com