Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Dark Fog Goa News: पावसाचा जोर कमी झाला असतानाच आता सकाळच्‍या वेळी धुके पडायला सुरुवात झाली आहे.
Dark Fog In Goa
Dark Fog In GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: पावसाचा जोर कमी झाला असतानाच आता सकाळच्‍या वेळी धुके पडायला सुरुवात झाली आहे. बुधवारी डिचोली, साखळीसह राज्‍याच्‍या इतर भागांत धुक्याचा प्रभाव प्रचंड प्रमाणात दिसून आला.

गेल्या काही दिवसांपासून सकाळच्‍या वेळी अधूनमधून धुके पडत होते. मात्र बुधवारी त्‍याचे प्रमाण मोठे होते. डिचोलीसह परिसराला गडद धुक्याने वेढले होते. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत होते. वाहनचालकांना धुक्यामुळे समोरील अस्पष्ट दिसत होते.

‘धुक्यात हरवली वाट’ असे म्हणण्याची वेळ चालकांवर आली. दिवे पेटवून त्‍यांना वाहने हाकावी लागली. सकाळी साडेआठपर्यंत धुक्याचाप्रभाव होता.

काजू, आंबा पिकाला धोका

धुक्याचा प्रभाव असाच राहिल्यास यंदा काजू आणि आंबा या मोसमी पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. धुक्यामुळे काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका अधिक असतो. कृषीतज्‍ज्ञांकडूनही तशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. दरम्‍यान, धुके पडू लागल्‍याने पावसाने माघार घेतल्याचे बोलले जात असले तरी अजूनही पावसाचे सावट असल्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ravi Naik Birth Anniversary Tribute
Goa Cashew Production Decline
97 Year Old Guna Maya Bohra Rescued
Dhyan Foundation Goa Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com