Priyank Kharge Controversial Statement Dainik Gomantak
देश

Karnataka Election 2023: वडिलांनंतर आता खर्गे यांच्या मुलाचंही PM मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, 'दिल्लीत एक नालायक मुलगा...'

Priyank Kharge Controversial Statement: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Manish Jadhav

Priyank Kharge Controversial Statement: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रियांक खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना 'नालायक' म्हटले.

प्रियांक म्हणाले की, 'दिल्लीत एक 'नालायक' मुलगा बसला आहे. मुलगा बेकार असेल तर घर कसं चालणार.' याआधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल होते.

भाजप-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरु

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याचबरोबर, काँग्रेसनेही भाजपच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

दुसरीकडे, कर्नाटकात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावत आहेत. मागील काँग्रेस (Congress) सरकारचे अपयश, कर्नाटकातील भाजप सरकारचे काम या बरोबरच यावेळी सर्पदोषाची सर्वाधिक चर्चा आहे.

मोदी जिथे जिथे सभा घ्यायला जातात तिथे काँग्रेसने आपल्याला शिव्या दिल्याची आठवण करुन द्यायला विसरत नाहीत.

काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे

एक दिवसापूर्वी पीएम मोदींनी स्वत:ला मिळालेल्या शिव्यांची संख्या सांगितली होती, मात्र प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसने मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केले.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी प्रचारादरम्यान म्हणाले की, मी जनतारुपी देवाच्या गळ्यातील साप आहे. साप हे भगवान शंकराच्या गळ्यातील शोभा आहे. माझ्यासाठी देशातील लोक हे देवाचे रुप आहेत.'

सापाच्या विधानाने लॉटरी लागली!

विशेष म्हणजे, कर्नाटकमध्ये भाजपने काँग्रेसचा थेट हल्ला पंतप्रधान मोदींवर केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांचे सापाचे वक्तव्य म्हणजे भाजपला लॉटरी लागल्यासारखे आहे. पंतप्रधानही कर्नाटकातील जनतेच्या दरबारात काँग्रेसवर प्रहार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT