Karnataka Assembly Elections 2023: मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर भाजपच्या या आमदाराची जीभ घसरली, ''सोनिया गांधी या...''

Basangouda Patil Controversial Statement: कर्नाटक विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहेत, तसतशी भाषेची पातळी घसरत चालली आहे.
Basangouda Patil
Basangouda Patil Dainik Gomantak

Basangouda Patil Controversial Statement Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहेत, तसतशी भाषेची पातळी घसरत चालली आहे. मते मिळविण्यासाठी नेते राजकीय शिष्टाचार पायदळी तुडवत आहेत.

आधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केले आणि आता भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

भाजपचे आमदार बसनगौडा पाटील (Basangouda Patil) यांनी तर सोनिया गांधींना 'विष कन्या' आणि 'पाकिस्तानी एजंट' असल्याचे म्हटले आहे.

याआधी मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातील हावेरी येथे काँग्रेसचा प्रचार करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काय विधान केले

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना, ‘तुमची विचारसरणी आणि तत्त्वांच्या जोरावर या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हीच पुरेसे आहात’, असे म्हटले होते.

भाजपची (BJP) विचारधारा, सिद्धांत अतिशय चुकीचा आहे, त्यामुळे देशाचा नाश होत आहे. तुमचा हा गैरसमज नसावा, मोदी हे विषारी सापासारखे आहेत, असेही खर्गे पुढे म्हणाले.

Basangouda Patil
Karnataka Assembly Election: काँग्रेस काळात लाईट नसल्यामुळे लोकसंख्या वाढली, भाजप मंत्र्यांचे वक्तव्य

आक्षेपार्ह विधानावर खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले

मात्र, या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर काही वेळातच मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरणही आले. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, 'मी पंतप्रधानांवर कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही.

मी पीएम मोदी आणि आरएसएसच्या विचारसरणीबद्दल बोललो आणि माझे मत त्यांच्या विचारसरणीबद्दल आहे, हा कोणावरही वैयक्तिक हल्ला नाही.'

भाजपने प्रत्युत्तर दिले

विशेष म्हणजे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर भाजपनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने (Congress) देशाची माफी मागावी, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

त्याचवेळी, खर्गे यांच्या वक्तव्यावर खासदार साध्वी प्रज्ञाही संतापल्या. साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसला 'संस्कृतीहीन पक्ष' म्हटले आहे.

Basangouda Patil
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक निवडणुकीपूर्वी बंगळुरु पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीची रोकड केली जप्त!

दुसरीकडे, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. दोन्ही पक्षांचे बडे नेते राज्यात सातत्याने प्रचार करत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंनी जोरदार भाषणबाजी सुरु झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com