Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे माजी नेते लक्ष्मण सवदी यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बंगळुरुमध्ये सांगितले की, लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर 12 एप्रिल रोजी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
डीके शिवकुमार म्हणाले की, लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी कोणतीही अट ठेवली नाही. आपला अपमान झाल्याचे त्यांना वाटते. अशा दिग्गज नेत्यांना काँग्रेस (Congress) पक्षात आणणे हे आपले कर्तव्य आहे. 9-10 पेक्षा जास्त विद्यमान आमदार कॉंग्रेसमध्ये सामील होऊ इच्छितात.
सवदी यांनी शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची त्यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानी भेट घेतली होती. शिवकुमार म्हणाले की, आज नंतर पत्रकार परिषद आयोजित केली जाईल, जिथे सवदी त्यांच्या राजकीय संक्रमणाची अधिकृत घोषणा करतील.
शिवकुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लक्ष्मण सवदी यांचे दुपारी 4 वाजता पक्षात स्वागत करत आहोत. तिथे ते पत्रकारांना संबोधितही करतील. त्यांनी आमच्यासोबत यायचे ठरवले आहे."
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, 'सावदी काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. भाजपने त्यांना अशी वागणूक देऊ नये. अथणी मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळेल याची 100 टक्के खात्री आहे. सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, मला आशा आहे की, ते त्यांच्या विधानसभेची जागा जिंकतील.
लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये गेल्यावर भाजपने निशाणा साधला. भाजपचे (BJP) कर्नाटक प्रभारी अरुण सिंह म्हणाले की, 'निवडणूक हरल्यानंतरही भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री आणि नंतर एमएलसी बनवले, त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये जात आहेत जिथे नेते दोन गटात विभागले गेले आहेत. त्यांनी मोठी चूक केली असून नंतर त्यांना पश्चात्ताप होईल.'
दरम्यान, माजी एमएलसी आणि काँग्रेस नेते रघु आचर यांनी शुक्रवारी पक्षप्रमुख एचडी देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत माजी सहयोगी जेडी(एस) मध्ये प्रवेश केला. सध्याच्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे. 224 जागांच्या विधानसभेसाठी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.