Rajasthan Dainik Gomantak
देश

Rajasthan: महिला शिक्षिकेबरोबर पळाली अल्पवयीन विद्यार्थिनी, पोलिस म्हणाले, दोघीही स्वत:च्या स्वेच्छेने...

Rajasthan News: बिकानेरच्या श्रीडुंगरगड तालुक्यातील एका खासगी शाळेतील महिला शिक्षिका शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीसह बेपत्ता झाली आहे.

Manish Jadhav

Rajasthan News: बिकानेरच्या श्रीडुंगरगड तालुक्यातील एका खासगी शाळेतील महिला शिक्षिका शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीसह बेपत्ता झाली आहे.

मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अविवाहित महिला शिक्षिका गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या मुलीशी जवळीकता वाढवत होती. शुक्रवारी सकाळी दोघीही शाळेत जात असल्याचे सांगून जयपूरला जाणाऱ्या बसमधून कुठेतरी निघून गेल्या.

विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवस शोध घेतल्यानंतर जयपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघीही शेवटच्या दिसल्या होत्या. पण त्यानंतर त्या कुठे गेल्या? याबद्दल काही सुगावा लागला नाही.

त्याचबरोबर, अल्पवयीन विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या एफआयआरमध्ये (FIR) शिक्षिका ही अतिशय चालाक आणि बदमाश होती, जिने आपले दोन भाऊ जुनैद आणि नावेद यांच्यासह आपल्या अल्पवयीन मुलीला कुठेतरी गायब केले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थिनी यांच्यात जवळचे संबंध असल्याची माहिती मिळत आहे.

बिकानेरचे पोलीस अधीक्षक (एसपी) तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार दोघींनी स्वत:च्या इच्छेने घर सोडले होते. पोलिसांची चार पथके आता दोघींचा शोध घेत आहेत.

मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने भादंविच्या कलम 363, 366, 120 बी आणि 84 जेजे नुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, वडिलांनीही श्रीडुंगरगड पोलिस ठाण्यात त्यांच्या 20 वर्षीय मुलीच्या (Girl) हरवल्याची तक्रार नोंदवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT