Railways Are Going To Dedicate To The Country Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला दोन नवीन रेल्वे मार्ग समर्पित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग देशाला समर्पित करतील.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग देशाला समर्पित करतील (Railways Are Going To Dedicate To The Country). अशी पंतप्रधान कार्यालयाने (PMO) गुरुवारीच ही माहिती दिली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग मोदी राष्ट्राला समर्पित करतील, असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातून येणारी वाहतूक कल्याणला जोडलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी दोन ट्रॅक धीम्या लोकलसाठी आणि दोन ट्रॅक जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात आले आहे.

उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले होते. ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून, त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, तीन मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश देखील आहे. या मार्गांमुळे मुंबईतील (Mumbai) लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीतील (Railway Transport) तसेच उपनगरीय रेल्वे वाहतुकीतील व्यत्यय मोठ्या प्रमाणात दूर होईल. यासह 36 नवीन उपनगरीय रेल्वे शहरात धावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT