PM Naredra Modi to Inaugurate 91 FM Dainik Gomantak
देश

PM to Inaugurate 91 FM Radio Station: 'मन की बात'च्या 100 व्या भागाआधी पंतप्रधान मोदी आज करणार 91 एफएम रेडिओ स्टेशन्सचे उद्घाटन

18 राज्यांसह दोन केंद्रशासित प्रदेशांतील 84 जिल्ह्यांमध्ये रेडियो केंद्रे

Akshay Nirmale

PM to Inaugurate 91 FM Radio Station: देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी 100 वॅट क्षमतेच्या 91 एफएम रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत.

18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या एफएम रेडिओ स्टेशन्सचे उद्घाटन केले जाईल.

ही रेडिओ केंद्रे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ज्या भागांतून इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, तेथे सुरू करण्यात येत आहेत. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सीमेला लागून असलेल्या काही भागात देखील ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत.

दोन कोटी लोक या एफएम ट्रान्समीटरद्वारे कव्हर केले जातील. यामुळे देशातील एफएम कनेक्टिव्हिटीची व्याप्ती 35,000 चौरस किमीने वाढेल.

PM मोदींच्या रेडिओ कार्यक्रम मन की बातचा 30 एप्रिल रोजी 100 वा भाग आहे. याच्या दोन दिवस आधी देशात रेडिओ कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले जात आहे.

या राज्यांमध्ये सुरू होणाऱ्या रेडिओ स्टेशन

बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लडाख, अंदमान आणि निकोबार या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही 91 एफएम रेडिओ स्टेशन सुरू होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT