Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ वाढ, दक्षिण गोव्यात घट; जाणून घ्या आजचे दर

जागतिक पातळीवरील क्रुडच्या दरांवरून तेलकंपन्या इंधन दरात बदल करत असतात
Petrol Diesel Prices In Goa
Petrol Diesel Prices In GoaDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये शुक्रवारी बदल झाले. उत्तर गोवा आणि पणजीतील दरांमध्ये किरकोळ वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट नोंदवण्यात आली.

उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.06 पैशांनी वाढ झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.34 पैशांनी घट झाली आहे. पणजी आणि उत्तर गोव्यातील डिझेल दरात प्रतीलीटर 0.05 पैशांनी वाढ झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील डिझेल दरात प्रतीलीटर 0.32 पैशांची घट झाली आहे.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

Petrol Diesel Prices In Goa
Astrology Tips: रागाच्या भरात दुसऱ्यांना बोलणं पडेल महागात...

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.90

Panjim ₹ 97.90

South Goa ₹ 97.41

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.44

Panjim ₹ 90.44

South Goa ₹ 89.97

Petrol Diesel Prices In Goa
7th Pay Commission: जुनी पेन्शन बहाल केल्यानंतर सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com