President Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

President Draupadi Murmu Speech: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला उद्देशून पहिले भाषण

मुली देशाचे भविष्य, 2047 पर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करू

गोमन्तक डिजिटल टीम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून राष्ट्राला पहिले भाषण दिले. यावेळी त्यांनी मुली ह्या देशाचे भविष्य आहेत असे सांगितले. राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या भयंकर आठवणींचे स्मरण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा स्मृतिदिन साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक सलोखा, मानवी सबलीकरण आणि एकात्मता वाढवणे हा आहे. सन 2047 पर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करू असा आपला संकल्प आहे. असे द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, '15 ऑगस्ट 1947 रोजी आपण वसाहतवादी राजवटीच्या बेड्या तोडल्या. स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आदरपूर्वक अभिवादन करूयात. स्वातंत्र्यासाठी आपण सर्वस्वाचा त्याग केला आहे. सध्या देशात घरोघरी तिरंगा मोहीम सुरू आहे. आज आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा अभिमानाने फडकत आहे. भारत दररोज प्रगती करत आहे. देशात सर्वांना समान अधिकार आहेत.'

'आज देशात आरोग्य, शिक्षण आणि अर्थव्यवस्था आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये जे चांगले बदल दिसून येत आहेत, त्याच्या मुळाशी सुशासनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नव्या भारताचे आशास्थान हे देशातील तरुण, शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील महिला आहेत. अनेक रूढी आणि अडथळ्यांवर मात करत महिला पुढे जात आहेत. सामाजिक आणि राजकीय प्रक्रियेत त्यांचा वाढता सहभाग निर्णायक ठरत आहे.' असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

पर्यावरण संबधित अनेक आव्हाने आज आपल्या समोर उभी आहेत. अशा वेळेत आपण भारताच्या सौंदर्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे रक्षण केले पाहिजे. पाणी, माती आणि जैविक विविधतेचे संवर्धन हे आपल्या भावी पिढ्यांसाठी आपले कर्तव्य आहे. आपल्या देशाची सुरक्षितता, प्रगती आणि समृद्धीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची शपथ घेऊयात. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषाणात नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

Viral Video: सापालाही आवडला नाही भोजपुरी गाण्यातला तो 'सीन', मोबाईलच्या स्क्रीनवर असं काय केलं की व्हिडिओ झटक्यात व्हायरल!

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

Ganesh Chaturthi Best Status: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास 10 स्टेटस, Watch, Download, Share

SCROLL FOR NEXT