Vasco: नागरिकांतर्फे "अखंड भारत दिना" निमित्त मशाल मिरवणूक

भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सदर मिरवणूक यशस्वी
Mashal Rally
Mashal RallyDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोत नागरिकांतर्फे "अखंड भारत दिना" निमित्त मशाल मिरवणूक काढण्यात आली. यंदा देश 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन असल्याने ही भव्य दिव्य अशी मशाल मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो नागरिकांनी भाग घेत भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सदर मिरवणूक यशस्वी केली.

(Mashal Rally organized by vasco citizens)

Mashal Rally
सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल गोव्यातील चार कर्मचाऱ्यांना सेवा पदके

मिरवणुकीला येथील हुतात्मा चौकाकडून सुरुवात झाली व टीबी कुन्हा येथे सांगता झाली. या मशाल मिरवणुकीत शाळा, विद्यालयातील विद्यार्थी, विविध संस्थांमधील लोक सहभागी झाले होते.

Mashal Rally
Ghoteli: येथील पोर्तुगीजकालीन पूल कोसळला

दरम्यान तत्पूर्वी भारताच्या फाळणीचा निषेध करण्यासाठी मुरगाव नगरपालिका ते हुतात्मा चौक पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, दीपक नाईक तसेच नगरसेवक व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1947 च्या स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी त्याद्वारे आपल्या देशातील लोकांवर अत्याचार, बलात्कार, क्रूरता आणि लैंगिक हिंसाचाराचा तीव्र निषेध या मूक मोर्चाद्वारे काढण्यात आला.

'हर घर तिरंगा मोहिमे' अंतर्गत पणजीतील मांडवी नदीवर तिरंगा बोट रॅली

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त "हरघर तिरंगा मोहिमेचा" भाग म्हणून पणजीतील मांडवी नदीवर तिरंगा बोट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय दळणवळण विभाग गोवा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी तिरंगा बोट रॅलीचे आयोजन केले होते, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, 75 तिरंगा असलेले 75 लोक मांडवी नदीतून 75 मिनिटे हर घर तिरंगा ब्रँडिंगने सजवलेल्या क्रूझवर प्रवास केला. यादरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com