Girls Dainik Gomantak
देश

Haryana: बंद कॅफेत 'अश्लील उद्योग', टाळं तोडलं अन् पोलिसांना 5 तरुण, 5 तरुणी सापडल्या आक्षेपार्ह अवस्थेत

Haryana Police: हरियाणातील यमुनानगर येथील कॅफेवर छापा टाकून पोलिसांनी 5 तरुण आणि 5 तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.

Manish Jadhav

Haryana News: हरियाणातील यमुनानगर येथील कॅफेवर छापा टाकून पोलिसांनी 5 तरुण आणि 5 तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. पोलिसांनी त्यांना पकडून पोलिस ठाण्यात नेले आणि चौकशी केल्यानंतर नातेवाईकांना माहिती दिली.

अटक करण्यात आलेले सर्व विद्यार्थी (Students) येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कॅफेच्या आत लहान केबिन बांधल्या होत्या. जिथे छोट्या पलंगांप्रमाणे फोमच्या गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी (Police) केलेल्या कारवाईदरम्यान कॅफेच्या आतून 10 तरुण-तरुणींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले.

कॅफेला बाहेरुन कुलूप होते

कॅफेमध्ये बऱ्याच दिवसांपासून चुकीच्या गोष्टी सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी कॅफेला बाहेरुन कुलूप होते. पोलिसांना त्यांच्या माहितीची खात्री होती. त्यामुळे कॅफेचे कुलूप तोडून आत गेले असता 5 तरुण आणि 5 तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. या घटनेनंतर कॅफेचालक फरार झाला आहे.

पोलिसांनी वेगवेगळ्या वाहनांतून जोडप्यांना पोलीस ठाण्यात नेले

अटक केलेल्या जोडप्यांना दोन वेगवेगळ्या वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी एसएचओ सिटी पृथ्वी सिंह यांनी सांगितले की, 5 तरुण आणि 5 तरुणींना अटक करण्यात आली आहे. ते या खोलीत का आले होते, याची चौकशी केली जात आहे. कॅफेचा मालक फोन उचलत नाही, तो लवकरच पकडला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT