Haryana: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री यांच्या गाडीचा अपघात, ताफ्यातील सर्व नेते थोडक्यात बचावले

अपघात होताच आलिशान एसयूव्ही कारच्या समोरच्या दोन एअर बॅगने लगेच ओपन झाल्या.
Bhupinder Singh Hooda Accident
Bhupinder Singh Hooda AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Bhupinder Singh Hooda Accident: हरियाणातील हिसार जिल्ह्यातील मतलौदा गावाजवळ रविवारी दुपारी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या कारचा अपघात झाला. कार अपघातात भूपेंद्र हुडा थोडक्यात बचावले आहेत.

काँग्रेसचे दिग्गज नेते हुड्डा यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हुड्डा हिसारच्या घिरई गावात वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांची कार अचानक रस्त्यावर आलेल्या निलगायीला धडकली आणि अपघात झाला.

माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याशिवाय माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश, माजी आमदार नरेश सेलवाल आणि ज्येष्ठ नेते धरमवीर गोयत हेही कारमध्ये होते. हिस्सार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.

अपघात होताच आलिशान एसयूव्ही कारच्या समोरच्या दोन एअर बॅगने लगेच ओपन झाल्या. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर गाडी सोडून सर्व स्वार दुसऱ्या वाहनात बसून आजूबाजूच्या गावाकडे निघाले.

Bhupinder Singh Hooda Accident
Panaji Hit And Run Case: जवळ आले होते बहिणीचे लग्न, त्यापूर्वीच भावाचा पणजीत 'हिट ॲण्ड रन' प्रकरणात मृ्त्यू

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपची विजेती स्वीटी बुरा हिच्या सन्मानार्थ हिसारच्या घिरईमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा हिसार येथे येत होते. त्यांचा ताफा मतलौडा गावाजवळ पोहोचला असता अचानक त्यांच्या वाहनासमोर एक नीलगाय आली. त्यामुळे कारचे नुकसान झाले. माजी मुख्यमंत्री आणि इतर सुखरूप असले तरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com