PM Narendra Modi In West Bengal Dainik Gomantak
देश

''गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे...''; संदेशखळीचा उल्लेख करत PM मोदींनी इंडिया आघाडीवर साधला निशाणा

PM Narendra Modi In West Bengal: संदेशखळी प्रकरणावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण असताना पंतप्रधानांचा हा दौरा होत आहे.

Manish Jadhav

PM Narendra Modi In West Bengal: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. संदेशखळी प्रकरणावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण असताना पंतप्रधानांचा हा दौरा होत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी 'इंडिया'वर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, संदेशखळी प्रकरणावर इंडिया आघाडीचे नेते गप्प आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देश दु:खी आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांवर गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे डोळे, कान आणि तोंड बंद असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये अत्याचार आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''संपूर्ण देश आज बंगालची स्थिती पाहत आहे. माँ, माटी, मानुषचा ढोल पिटणाऱ्या टीएमसीने संदेशखळीतील लेकीबाळींबरोबर काय केले हे पाहून संपूर्ण देश दु:खी आणि संतप्त आहे.''

ममता दीदी आणि टीएमसीच्या लोकांनी आरोपींना वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व काही केले, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रहार केला. संदेशखळीतील महिलांसाठी भाजपच्या लोकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. टीएमसीचा हा गुन्हेगार नेता जवळपास दोन महिने फरार होता. त्याला वाचवण्यासाठी ममता सरकारने सर्व काही केले. पंतप्रधानांनी तिथे उपस्थित लोकांना विचारले की, 'तुम्ही अशा टीएमसीला माफ कराल का?'

पंतप्रधान पुढे म्हणाले की, "माता-भगिनींसोबत जे घडले त्याचा बदला तुम्ही घेणार की नाही? बंगालची जनता ममता दीदींना जाब विचारत आहे. दीदी, तुमच्यासाठी बंगालच्या महिलांपेक्षा काही लोकांची मते महत्त्वाची झाली आहेत का?" पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, "इंडिया आघाडीचे नेते गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे संदेशखळीवर डोळे, कान आणि तोंड बंद ठेवून होते."

पंतप्रधान मोदी शेवटी म्हणाले की, "भ्रष्ट कुटुंबातील सदस्यांना आणि तुष्टीकरण करणाऱ्यांना पाठिंबा देणे हे इंडिया आघाडीचे एकमेव काम उरले आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने जुलूमशाहीचा नवा पायंडा घातला आहे. येथील प्राथमिक शिक्षकांच्या भरतीत टीएमसीने मोठा घोटाळा केला. पालिका भरतीत घोटाळा झाला. गरिबांना रेशन देण्यात घोटाळा झाला, हेच काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे सत्य आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT