Sandeshkhali Case: TMC नेते शाहजहान शेख यांना अटक, महिलांवर अत्याचार, ईडीवरील हल्ला; संदेशखळीत आत्तापर्यंत काय घडलं?

TMC Leader Shahjahan Sheikh Arrested: उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांना पोलिसांनी अटक केली. शाहजहान यांना अटक करण्यासाठी पोलिसांना 55 दिवस लागले.
Sandeshkhali Violence Timeline TMC Leader Shahjahan Sheikh Arrested
Sandeshkhali Violence Timeline TMC Leader Shahjahan Sheikh Arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

Sandeshkhali Case: संदेशखळी प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारबाबत कठोरता दाखवत टीएमसीचे दबंग नेते शाहजहान शेख यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे म्हटले होते. यातच आता, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांना पोलिसांनी अटक केली. शाहजहान यांना अटक करण्यासाठी बंगाल पोलिसांना 55 दिवस लागले. दरम्यान, शाहजहान यांच्यावर ईडीच्या टीमवर हल्ला करण्यापासून ते महिलांवर अत्याचार करण्यापर्यंतचे जघन्य गुन्हे दाखल आहेत. त्यानंतरही बंगाल पोलीस त्यांना अटक करत नव्हते. मात्र, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शाहजहान यांना बंगाल पोलिसांनी अखेर 55 दिवसांनी अटक केली.

दरम्यान, संदेशखळी हे सुंदरबन डेल्टामध्ये स्थित एक लहान बेट आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हे गाव काही दिवसांपासून चर्चेत आहे. टीएमसी नेते शाहजहान शेख यांचे निवासस्थानही संदेशखळी येथे आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध आगोदरच चौकशी सुरु आहे. 5 जानेवारी रोजी ईडीची टीम शाहजहान शेख यांच्या निवासस्थानी छापा टाकणार होती. मात्र त्या आगोदरच शाहजहान शेख यांच्या समर्थकांनी ईडीच्या टीमवर हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहजहान शेख हे फरार होते.

दुसरीकडे, शाहजहान शेख फरार असताना संदेशखळी येथील महिलांनी हिंमत दाखवून रस्त्यावर उतरुन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची ह्रदयद्रावक कहाणी सांगितली. अलीकडेच शेकडो महिलांनी रास्ता रोको करुन निषेध केला. महिलांनी सांगितले की, ''टीएमसी नेते शाहजहान शेख आणि त्यांचे सहकारी त्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहेत. टीएमसीचे लोक महिलांवर अत्याचार करतात. ते जबरदस्तीने घरात घुसून लेकीबाळींवर अत्याचार करतात. जर त्यांच्या नजरेत एखादी सुंदर आणि तरुण स्त्री आली तर तिला त्यांच्याबरोबर घेऊन जातात. त्यानंतर ते तिच्यावर अनेक दिवस अत्याचार करतात. त्यांचे समाधान होईपर्यंत ते या स्त्रीला आपल्या ताब्यात ठेवतात.'' दुसरीकडे, हे प्रकरण समोर आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली.

Sandeshkhali Violence Timeline TMC Leader Shahjahan Sheikh Arrested
Sandeshkhali Case: 'शहाजहान शेखला तात्काळ अटक करा', कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

ईडी टीमवरील हल्ल्यापासून शाहजहान शेख यांच्या अटकेपर्यंत काय घडलं?

5 जानेवारी: ईडीची टीम शाहजहान शेख यांच्या निवासस्थानी छापा टाकणार होती. तत्पूर्वीच, शाहजहान यांच्या समर्थकांनी ईडीच्या टीमवर हल्ला केला, त्यात तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. समर्थकांनी शहाजहान यांना पळून जाण्यास मदत केली.

8 फेब्रुवारी: शेकडो महिला हातात झाडू आणि काठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी रास्ता रोको केला. शाहजहान आणि त्यांचे दोन सहकारी शिबा प्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महिलांनी केली. महिलांनी सांगितले की, टीएमसीचे दबंग लोक त्यांच्या घरातून लेकीबाळींना पळवून नेतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावतात.

9 फेब्रुवारी: महिला आंदोलकांनी शिबा प्रसाद हाजरा यांच्या ठिकाणावर हल्ला केला आणि त्यांच्या पोल्ट्री फार्मला आग लावली.

10 फेब्रुवारी: उत्तम सरदारला पोलिसांनी अटक केली.

12 फेब्रुवारी: भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील शाब्दिक वॉर आणखी तीव्र झाले आहे. संदेशखळी येथे हिंदू महिलांवर अत्याचार होत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला.

13 फेब्रुवारी: आयपीएस अधिकारी सोमा दास मित्रा यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिसांचे दहा सदस्यीय विशेष पथक संदेशखळी गावात गेले.

14 फेब्रुवारी: भाजप खासदार सुकांत मजुमदार यांच्या तक्रारीवरुन लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने पश्चिम बंगालमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी सुकांत मजुमदार यांना संदेशखळी येथे जाण्यापासून रोखले, त्यामुळे ते जखमी झाल्याचा आरोप आहे.

17 फेब्रुवारी: पोलिसांनी शिबा प्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यावर सामूहिक अत्याचार आणि खुनाच्या प्रयत्नाचे आरोप जोडले.

18 फेब्रुवारी: शिबा प्रसाद हाजरा यांना पोलिसांनी अटक केली.

19 फेब्रुवारी: संदेशखळीतील महिलांवरील अत्याचार हे इराक आणि पाकिस्तानसारख्या देशांतील महिलांवरील अत्याचारांची आठवण करुन देणारा असल्याचा दावा भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी केला.

Sandeshkhali Violence Timeline TMC Leader Shahjahan Sheikh Arrested
Sandeshkhali Case: संदेशखळीत आणखी एक बलात्काराचे प्रकरण, महिलेचा TMC नेते शिबू हाजरा यांच्यावर आरोप

20 फेब्रुवारी: कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले. शाहजहान शेख यांना आत्मसमर्पण करण्यास सांगत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

21 फेब्रुवारी: पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार म्हणाले की, संदेशखळीतील प्रत्येक व्यक्तीची तक्रार पोलीस ऐकतील. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

22 फेब्रुवारी: संदेशखळीच्या लोकांनी शाहजहान यांनी ताब्यात घेतलेले बाल उद्यान मुक्त केले.

23 फेब्रुवारी: संदेशखळीच्या लोकांनी निषेध केला आणि टीएमसी नेत्यांची मालमत्ता जाळली.

24 फेब्रुवारी: ममता सरकारच्या मंत्र्यांसह तृणमूलच्या शिष्टमंडळाने संदेशखळीला भेट दिली. शिष्टमंडळाने संदेशखळीतील लोकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

25 फेब्रुवारी: टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, पक्ष शाहजहान शेख यांचा बचाव करत नाही. कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या तपासाला स्थगिती दिली होती, त्यामुळे त्यांना अटक झालेली नाही.

Sandeshkhali Violence Timeline TMC Leader Shahjahan Sheikh Arrested
Sandeshkhali Violence: ''पाकिस्तानात हिंदू महिलांवर असे अत्याचार होतात...'', संदेशखळी प्रकरणावरुन भाजप खासदार ममता सरकारवर बरसल्या

26 फेब्रुवारी: शाहजहान यांना अटक करावी, असे कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले. त्यांच्या अटकेला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

27 फेब्रुवारी: पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद यांनी राज्य सरकारला शाहजहान यांना पकडू शकत नसल्यास 72 तासांत अहवाल देण्यास सांगितले.

28 फेब्रुवारी: आदिवासींची जमीन कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

29 फेब्रुवारी: पश्चिम बंगाल पोलिसांनी शाहजहान यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com