PM Narendra Modi In G20: भारत स्वार्थी नाही तर जागतिक पातळीवर स्वतःची जबाबदारी पार पाडण्यावर विश्वास ठेवणारा देश आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या जी-20 परिषदेत ते बोलत होते. मोदींनी यावेळी भारत-इंडोनेशिया संबंधांला नव्याने उजाळा दिला.
मोदी म्हणाले, भारताची सर्जनशीलता, तंत्रज्ञान, नाविण्य, उद्योग यांनी जगात स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जगातील बड्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. जगातील जेव्हा 10 यूनिकॉर्न (100 कोटी रूपयांची उलाढाल केलेल्या) कंपन्या बनतात तेव्हा त्यातील एक भारतीय असते.
मोदी म्हणाले, जसा भारतात हिमालय तसा बालीमध्ये अगुंग पर्वत आहे. भारतात गंगा आहे तर बालीत तीर्थगंगा आहे. आम्ही भारतात प्रत्येक शुभकार्याचा श्रीगणेशा करत असतो. येथेही घराघरात श्री गणेश विराजमान आहेत. भारत इंडोनेशियापासून 90 नॉटिकल मैल दूर नाही तर 90 नॉटिकल मैल जवळ आहे. बालीची भुमी महर्षी मार्कंडेय आणि महर्षी अगस्त्य यांच्या तपाने पवित्र झालेली आहे. भारतातील ओडिशामध्ये सध्या बाली यात्रा सुरू आहे. ओडिशातील लोकांच्या मनात बाली आहे. बालीशी भारताचा हजारो वर्षांचे नाते आहे. इंडोनेशियाने ही परंपरा जीवंत ठेवली आहे.
युक्रेनमध्ये युद्धबंदीचा पर्याय शोधावा लागेल
मोदी म्हणाले, युक्रेनमध्ये युद्धबंदीचा पर्याय शोधावा लागेल. मुत्सद्देगिरीचा मार्गच वापरावा लागेल, गेल्या शतकात दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर तेव्हाच्या नेत्यांनी शांततेचा मार्ग निवडण्याचा पर्याय स्विकारला. आता आपली वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.
बायडेन यांनी घेतली मोदींची भेट
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वतः पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चिनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.