PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

Gujarat Assembly Election: निवडणुकीच्या घोषणेनंतर PM मोदींची होणार रॅली

Gujarat Assembly Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Gujarat Assembly Elections: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरातमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असेल. कार्यक्रमातर्गंत पंतप्रधान मोदी भावनगर, सुरेंद्रनगर आणि वलसाड इथे जाणार असून, ते इथे निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने (Election Commission) गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. 182 जागांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे.

तसेच, गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका दोन दशकांहून अधिक काळ राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपसाठी आव्हानात्मक ठरु शकतात. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षाकडून (आप) चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, गुजरातच्या (Gujarat) 14 व्या विधानसभेसाठी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. तर 1995 पासून सत्तेत असलेल्या पक्षाला नवीन सरकार बनवण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्यावेळी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्यात 77 जागा जिंकल्या होत्या. तर सहा जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या.

दुसरीकडे, आजच्या घडीला गुजरात विधानसभेत भाजपचे 111 आमदार आहेत, तर काँग्रेस आमदारांची संख्या 62 आहे. दोन जागा BTP आमदारांच्या ताब्यात आहेत, आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) आणि एक जागा अपक्ष आमदाराच्या ताब्यात आहे. राज्यात विधानसभेच्या पाच जागा रिक्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT