PM Narendr Modi Dainik Gomantak
देश

पश्चिम आशियातील संघर्षाचे पडसाद संसदेत, पंतप्रधान मोदी मांडणार भारताची भूमिका

रशिया-युक्रेन युद्धानंतर आता पश्चिम आशियामध्ये (Middle East) पेटलेला संघर्ष जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे.

Sameer Amunekar

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या युद्धाचे थेट पडसाद भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवर उमटले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी २ वाजता लोकसभेत देशाला संबोधित करणार आहेत. या संघर्षाचा भारतीय नागरिकांच्या जीवनावर किमान परिणाम व्हावा, यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांची माहिती ते सभागृहात देतील.

इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे खनिज तेल आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर संकट ओढवले होते. इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला 'होर्मुज जलमार्ग' रोखून धरल्याने भारताची चिंता वाढली होती. मात्र, राजनैतिक वाटाघाटींनंतर भारतीय जहाजांना या मार्गावरून जाण्याची विशेष सवलत मिळाली आहे, ही भारतासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. देशात इंधन टंचाई भासू नये यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था केली असून, साठवणुकीवर भर दिला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी कालच 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी'ची (CCS) महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, हे संकट केवळ एका मंत्रालयापुरते मर्यादित नसून सर्व विभागांनी 'संपूर्ण सरकार' (Whole of Government) या भूमिकेतून एकत्र काम करणे आवश्यक आहे. मंत्र्यांचा आणि सचिवांचा एक विशेष गट तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. "नागरिकांना या जागतिक संघर्षाची झळ बसू नये, यासाठी सरकारचे सर्व अंग एकजुटीने काम करतील," असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

युद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पंतप्रधानांनी राज्य सरकारांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः खते, कृषी उत्पादने आणि अन्नसुरक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शिपिंग, व्यापार, वित्त आणि पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत होऊ नये, यासाठी मंत्रिमंडळ सचिवांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT