Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

'...तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करतात': PM मोदींनी KCR सरकारवर साधला निशाणा

तेलंगणातील टीआरएस सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

तेलंगणातील टीआरएस सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी निशाणा साधला. मोदी म्हणाले की, ''जेव्हा एका कुटुंबाला समर्पित असणारा पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा चेहरा बनतात.''

दरम्यान, राज्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी (Prime Minister Narendra Modi) पुढे म्हणाले, "राजकीय घराणेशाहीमुळे देशातील तरुणांना राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. अशा तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा करुन त्यांना राजकारणात येण्यापासून रोखले जाते. घराणेशाहीपासून स्वातंत्र्य हा 21 व्या शतकातील भारताचा (India) संकल्प आहे."

कौटुंबिक पक्ष केवळ स्वत: ला समृद्ध करतात

मोदी पुढे म्हणाले, "तेलंगणातील (Telangana) लोक हे पाहत आहेत की, जेव्हा एका कुटुंबाला समर्पित असणारा पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचा (Corruption) सर्वात मोठा चेहरा बनतात. तेलंगणातील लोक हे ही पाहत आहेत की, कुटुंबातील सदस्य स्वत:ची भरभराट करतात. आणि तिजोरी भरतात."

पंतप्रधानांनी पुढे अधोरेखित केले की, जेव्हा राजकीय घराणेशाही संपुष्ठात येईल, तेव्हा विकासाचे मार्ग खुले होतील. ते पुढे म्हणाले, "आता ही मोहीम पुढे नेण्याची जबाबदारी माझ्या तेलंगणातील बंधू-भगिनींची आहे."

सत्तेत अनेक कुटुंबीय

केटी रामाराव, तेलंगणाचे मुख्यमंत्री कलवकुंतला चंद्रशेखर राव यांचे पुत्र, सिरिल्ला येथील आमदार आहेत. त्याचबरोबर ते नगरपालिका प्रशासन आणि शहर विकास मंत्री आहेत. त्याच वेळी, केसीआर यांची मुलगी कविता यांनी निजामाबादमधून खासदार म्हणून काम केले आहे. सध्या 2020 पासून विधान परिषद, निझामाबादच्या सदस्या म्हणून काम करत आहे. तर केसीआर यांचे पुतणे हरीश राव हे सिद्धीपेटचे आमदार असून तेलंगणाचे अर्थमंत्री आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT