राहुल गांधींचा चीन-अमेरिकेबाबत मोदी सरकारला सूचक सल्ला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणाबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणाबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. यासोबतच त्यांनी भारताच्या शेजारी देशाबाबतही त्यांचे मत मांडले आहे. राहुल गांधींच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्यांनी चीनच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसत आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, सध्या जगात दोन प्रकारचे दृष्टीकोन कार्यरत आहेत. चीनचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर अमेरिकेचा दृष्टिकोन वेगळा आहे. पायाभूत सुविधा, 5G सारख्या सुविधा देऊन चीन आपल्या शेजारी देशांना आकर्षित करत आहे.

Rahul Gandhi
कोरोना काळात जे चीन करू शकला नाही ते भारताने करून दाखवलं: जो बायडेन

अमेरिका आणि चीनचा दृष्टिकोन वेगळा आहे

चीनचे विस्तारवादी धोरण थांबले पाहिजे, असे अमेरिकेसारख्या देशांचे मत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र, असे असले तरी माझा प्रश्न आहे की, आपण यासाठी काय ऑफर करत आहात. जेव्हा आपण अमेरिकेबद्दल बोलतो तेव्हा फक्त संरक्षणाबाबत बोलतो. पण आता लोक समृद्ध करण्याच्या मुद्द्यांवरही बोलले पाहिजे, असे राहूल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
ड्रगनची नवी योजना, 10 देशांशी करणार डील; ''काबीज करण्याचा कट''

चीनचे धोरण भारताच्या हिताचे नाही

चीनचा विस्तारवाद भारताच्या हिताचा नाही. चीन आणि अमेरिका या दोघांची रणनीती वेगळी आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबतचे आमचे संबंध संरक्षणाच्या पलीकडे जाऊन संयुक्तपणे समृद्धी निर्माण करणाऱ्या आर्थिक करारांकडे वळले पाहिजेत. चीनचा मुकाबला करण्यासाठी पर्यायी जागतिक दृष्टीकोन तयार करण्यात मदत करण्याची भारताकडे धोरणात्मक संधी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन
Kerala MLA MP Cabinet Berth Fraud Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com