जालियनवाला बागवरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धूही उपस्थित होते. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी पंजाबमध्ये पोहोचले.
Punjab Assembly Elections 2022
Punjab Assembly Elections 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी 27 जानेवारीला पंजाबमध्ये पोहोचले. येथे त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसह सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धूही (Navjyot Singh Sidhu) उपस्थित होते. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी पंजाबमध्ये पोहोचले. (Pujab Assembly Election 2022 Latest News Udpates)

Punjab Assembly Elections 2022
Corona Updates: केंद्राकडून राज्यांना सूचना! सतर्क राहा, हलगर्जीपणा करू नका

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विटरवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते सुवर्ण मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहेत. हरमंदिर साहिब येथे पंजाबच्या (Punjab) भवितव्यासाठी काँग्रेस (Congress) उमेदवारांसोबत प्रार्थना केली, असे ट्विट त्यांनी केले. पंजाबमध्ये पुढील महिन्यात 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी 2022 (Assembly Elections 2022) मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत सिद्धू आणि चन्नी यांची उपस्थिती ही मोठी राजकीय चिन्हे दाखवत आहेत. पक्षाने अद्याप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पक्ष सिद्धू आणि चन्नी यांच्यापैकी कोणाचा चेहरा जनतेच्या समोर आणतो. तसेच, आतापर्यंत झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये चन्नी यांचे नाव आघाडीवर आले आहे.

सुवर्ण मंदिरात प्रार्थना केल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या उमेदवारांसोबत 'लंगर' खाल्ला. पंजाबमधील आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करत राहुल गांधी मिठापूर, जालंधर येथे डिजिटल रॅलीला संबोधित करणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पंजाब दौरा आहे.

Punjab Assembly Elections 2022
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एअर इंडिया टाटांच्या ताफ्यात

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 109 उमेदवारांची घोषणा केली आहे. आठ जागांसाठीच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. संध्याकाळी दिल्लीत परतण्यापूर्वी राहुल गांधी जालंधरमधील मिठापूर येथे ‘पंजाब फतह’ डिजिटल रॅलीला संबोधित करतील.

अमृतसर विमानतळावर चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi), उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा आणि ओपी सोनी यांनी राहुल गांधींचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधींनी जालियनवाला बागला भेट दिली. या दौऱ्याची छायाचित्रेही पक्षाने ट्विटरवर शेअर केली आहेत.

राहुल गांधींनी जालियनवाला बागच्या व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अनुभव शेअर केला आहे. यादरम्यान जालियनवाला बागेत झालेल्या बदलांवरून पक्षाने ट्विटरवरून मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधत ट्विट केले. "जालियनवाला बाग हा आमचा अभिमान आहे आणि त्यात कोणीही बदल केल्याने हा अभिमान कमी होणार नाही. राहुल गांधींनी जालियनवाला बागच्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचा अभिप्राय विजिटर्स बुकमध्ये नोंद केला आहे,"असे काँग्रेसच्या ट्विटमध्ये लिहिले आहेे.

Punjab Assembly Elections 2022
गोव्यात प्रचारावेळी बेळगावच्या नेत्याने मांडला अश्लीलतेचा बाजार

निवडणूक आयोगाने पंजाबसह पाच राज्यांमध्ये रॅली आणि रोड शोवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. पंजाबमध्ये सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून राज्यात 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे. यावेळी आम आदमी पक्षही (AAP) निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून काँग्रेसला कडवी टक्कर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com