PM Modi Dainik Gomantak
देश

Israel-Hamas War: पंतप्रधान मोदींनी इस्रायल-हमास युद्धातील नागरिकांच्या मृत्यूचा केला निषेध; म्हणाले...

PM Modi: इस्रायल-हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. या युद्धात नागरिकांच्या हत्येचा त्यांनी निषेध केला आहे.

Manish Jadhav

PM Modi Condemned The Death Of Civilians Amid Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. या युद्धात नागरिकांच्या हत्येचा त्यांनी निषेध केला आहे.

शुक्रवारी व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटच्या व्हर्चुअल कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यात सुरु असलेल्या युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा भारत निषेध करतो.

दक्षिण-पश्चिम आशियामध्ये नवीन आव्हाने उभी राहत असल्याचेही ते म्हणाले. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने निषेधही केला होता. संपूर्ण वादात आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच, पीएम मोदी म्हणाले की, पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महमूद अब्बास यांच्याशी बोलल्यानंतर भारताने गाझा पट्टीतील पीडितांसाठी मदत सामग्री देखील पाठवली आहे.

ग्लोबल साउथ समिट दुसऱ्यांदा होत आहे

दरम्यान, ही दुसरी व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट आहे, ज्याचे आयोजन भारताने केले आहे. यापूर्वी, जानेवारीमध्ये व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. भारतही त्याचे यजमान होता. आता भारत (India) दुसऱ्यांदा यजमान आहे.

उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा असा काळ आहे जेव्हा दक्षिण आशियातील शक्तींनी एकत्र येऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. नवीन तंत्रज्ञानामुळे ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साउथमधील अंतर वाढू नये असे आमचे मत आहे, असेही पीएम मोदी म्हणाले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायला हवा. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत पुढील महिन्यात आर्टिफिशियल ग्लोबल पार्टनरशिप समिटचेही आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

10 सत्रे असतील

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ही दुसरी व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट आहे, या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत. ते म्हणाले की, ग्लोबल साउथच्या देशांसोबत G20 आयोजित करताना मिळालेल्या यशावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जाईल.

या कार्यक्रमात प्रामुख्याने दहा सत्रे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन सत्राव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी समारोपाच्या सत्राचे अध्यक्षपद भूषवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT