Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Kisan: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार 2000 रुपये

या योजनेनुसार (PM Kisan) दर वर्षी ₹ 6000 खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात अनेक योजनांचा शुभारंभ मोदी सरकारने (Modi Government) सत्तेत येताच केला. त्यापैकी एक असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) 9 वा हफ्ता 9 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पाठविण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशातील शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांच्या नोदंणीकृत बॅंक खात्यामध्ये ₹ 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. या योजनेनुसार दर वर्षी ₹ 6000 खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहेत.

या योजनेतंर्गत ही दोन हजार रुपायंची रक्कम एकूण 3 हफ्त्यांमधून पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत मोदी सरकारकडून एकूण 8 हफ्ते पाठविण्यात आले आहेत. PM Kisan योजनेनुसार 12 कोटी 11 लाख शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. तुम्ही जर या योजनेसाठी निकषांनुसार पात्र असाल मात्र नोंदणी केलेली नसेल तर, आताच तुम्ही करु शकता. शिवाय तुम्ही जर या आठवड्यामध्येच जर नोंदणी केली तर तुम्हीही नववा हप्त्यासाठी पात्र होऊ शकता. सरकारी आकड्यानुसार एकूण 42 लाख नागरिकांनी फायदा लाटला आहे.

योजनेसाठी अर्ज केला असेल तर..

या योजनेंतर्गत नाव नोंदणी केली असेल तर तर तुम्ही तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये ऑनलाईन तपासू शकता. केंद्र शासनाच्या pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुमंच नाव शोधू शकता. वेबसाईट ओपन झाल्यानंतर मेन्यू ऑप्शन येईल. मेन्यूमध्ये फार्मर कॉर्नरवर क्लिक करावं. त्यानंतर तुम्ही पुढे लाभार्थी सूचीवर लिंक क्लिक करावे. तिथे तुम्हाला आवश्यक ती माहिती विचारण्यात येईल. योग्य ती माहिती टाकल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट क्लिक करायचयं. त्यानंततर तुम्हाला सर्व माहिती दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT