पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI चेअनावरन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, आज देश डिजिटल व्यवहारांना (Online Transaction) एक नवीन आयाम देत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे ऑनलाईन व्यवहार अजुन वाढतील. तसेच व्यवहार पारदर्शक आणि सुलभ मार्गाने होतील. केवळ सरकारच नाही, मात्र कोणतीही सामान्य व्यक्ती किंवा संस्था एखाद्याला त्यांच्या उपचारात, त्यांच्या शिक्षणात किंवा इतर कोणत्याही कामासाठी मदत करू इच्छित असेल तर ते रोख रकमेऐवजी e-RUPI देऊ शकतील. त्यामुळे सदर व्यक्तीने दिलेला पैसा त्याच कामासाठी वापरला जाईल ज्यासाठी ती रक्कम दिली गेली आणि याची खात्री देखील त्याला होईल असा विश्वास व्यक्त केला. (PM Narendra Modi launched e-RUPI)
पंतप्रधान म्हणाले, ज्या हेतूसाठी कोणत्याही व्यक्तीने केलेली मदत ही योग्य कामासाठी वापरली जाईल. कालांतराने, e-RUPI मध्ये आणखी गोष्टी जोडल्या जातील. जसे कोणालाही एखाद्याच्या उपचारात खर्च करायचा असेल, कोणी टीबीच्या रुग्णाला योग्य औषधे आणि अन्नासाठी आर्थिक मदत देऊ इच्छित असेल, मुलांना अन्न देऊ इच्छित असेल, पर्यावरणाशी संबंधित सुविधा पुरवू इच्छित असेल, तर e-RUPI खूप उपयुक्त आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आज जगाला दाखवत आहे की तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बाबतीत मागे नाही. नवीन कल्पना , सेवा वितरणांमध्ये तंत्रज्ञानांच्या वापराच्या बाबतीत भारताकडे जगातील मोठ्या देशांसह जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.