Saif Ali Khan Attacked Dainik Gomantak
देश

Saif Ali Khan Attacked: हल्ल्यावेळी सैफच्या शरीरात घुसलेला चाकूचा तुकडा ऑपरेशन करुन काढला

Bollywood Actor Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी (15 जानेवारी) रात्री उशिरा त्याच्याच घरात चाकूने हल्ला करण्यात आला.

Manish Jadhav

Bollywood Actor Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी (15 जानेवारी) रात्री उशिरा त्याच्याच घरात चाकूने हल्ला करण्यात आला. दरम्यान, तात्काळ त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती ठीक असून गुरुवारी (16 जानेवारी) पहाटे लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने सैफवर शस्त्रक्रिया केली, ज्यामध्ये त्याच्या मणक्याजवळ अडकलेला चाकूचा तुटलेला तुकडा काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. घरात घुसलेल्या या अज्ञात व्यक्तीचा मोलकरणीशी वाद झाला. जेव्हा सैफने मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. घटनेच्या वेळी सैफच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही उपस्थित होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. करीनाच्या टीमने सांगितले की, घरी सर्वजण ठीक आहेत. तर पोलिसांनी सांगितले की, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास सैफच्या वांद्रे येथील निवासस्थानी घडली. हल्ल्यात सैफच्या हाताला, मणक्याला आणि मानेला दुखापत झाली. घरातील एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अज्ञात व्यक्ती सैफच्या चार वर्षांच्या मुलाच्या बेडरुममधून घरात घुसला होता. मुलाला ओलीस ठेवून त्याने तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र जेव्हा सैफने हस्तक्षेप केला तेव्हा त्याने त्याच्यावरच हल्ला केला. कर्मचाऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्यांच्यावरही हल्ला केला.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयिताला शुक्रवारी (17 जानेवारी) सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची पोलिस कोठडीत चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT