Saif Ali Khan Divorce: सैफ आणि अमृता 18 वर्षापूर्वी झाले होते वेगळे, अमृताला दिले होते एवढे पैसे

13 वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि 18 वर्षापूर्वी दोघे वेगळे झाले.
Saif Ali Khan Divorce
Saif Ali Khan DivorceDainik Gomantak

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या करिना कपूर खान सोबत सुखाचा संसार करत आहे. दोघांना दोन मुले देखील आहेत. पण, सैफ अली खानचे यापूर्वी अमृता सिंगशी लग्न झाले होते. सैफ चित्रपटात येण्यापूर्वीच त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी असलेली अभिनेत्री अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता. एवढेच नाही तर दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न देखील केले होते. पण त्यानंतर 13 वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि 18 वर्षापूर्वी दोघे वेगळे झाले.

Saif Ali Khan Divorce
Iffi Goa: इफ्फीकडून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा गौरव; दाखवले जाणार तीन जुने चित्रपट

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले होती. घटस्फोट झाला असला तरी अमृतापासून घटस्फोट घेणे सैफ अली खानला चांगलेच महागात पडले होते. विविध माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने घटस्फोटानंतर अमृता सिंगला पोटगी म्हणून मोठी रक्कम दिली होती. अमृता सिंगने सैफकडून घटस्फोटासाठी तब्बल पाच कोटी रुपये पोटगी म्हणून मागितले होते. तसेच, इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत सैफला दरमहा एक लाख रुपये द्यावे लागले. अशी माहिती आहे.

Saif Ali Khan Divorce
Ajay Devgan Surprise In Iffi: इफ्फीत अजय देवगणचे चाहत्यांसाठी खास गिफ्ट, स्वत: राहणार उपस्थित

घटस्फोटानंतर दोघांमध्ये अनेक दिवस वाद सुरू होता. एका मुलाखतीत सैफने अमृतावर अनेक आरोप केले होते. अमृता त्याला सारा आणि इब्राहिमला भेटण्यापासून लांब ठेवते असा आरोप सैफने केला होता. मुलांना तो खूप मिस करतो पण त्याला त्याच्या मुलांना भेटू दिले जात नव्हते. दरम्यान, सध्या सारा आणि इब्राहिम दोघेही मोठे झाले असून, सारा बॉलिवूडमधील एक मोठी अभिनेत्री झाली आहे. तर, इब्राहिम सध्या तरी बॉलिवूडपासून दूर असल्याचे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com