Chief Minister Shivraj Singh Chauhan Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Election: शिवराज मामा झळकले क्यूआर कोडवर, कॉंग्रेसच्या पोस्टरबाजीला कंपनीचा कडक इशारा

Madhya Pradesh Election: मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात क्यूआर कोडवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा फोटो वापरण्यात आला होता.

Manish Jadhav

Madhya Pradesh Election: मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात क्यूआर कोडवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा फोटो वापरण्यात आला होता. त्याखाली PhonePe असे लिहिले होते. यावर कंपनीने आता कडक प्रतिक्रिया दिली आहे.

कंपनीने आपल्या लोगोच्या वापरावर आक्षेप घेतला असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. भोपाळमध्ये हे पोस्टर लावण्यात आले होते, ज्यामध्ये शिवराज सिंह चौहान यांच्यावर काम करण्याऐवजी पैसे घेऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पोस्टर्सवर 50% लाओ, फोनपे काम करो (तुमचे काम पूर्ण करण्यासाठी 50% कमिशन द्या) असे लिहिले आहे.

तथापि, PhonePe ने पोस्टरवर ब्रँडिंग वापरल्याबद्दल काँग्रेसला (Congress) फटकारले आणि ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. कंपनीने लिहिले की, PhonePe आपल्या ब्रँड लोगोच्या कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे अनधिकृत वापरावर आक्षेप घेते, मग ते राजकीय असो किंवा गैर-राजकीय. आम्ही कोणत्याही राजकीय मोहिमेशी किंवा पक्षाशी संबंधित नाही.

दुसर्‍या ट्विटमध्ये कंपनीने म्हटले आहे की, PhonePe लोगो हा आमच्या कंपनीचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे आणि PhonePe च्या बौद्धिक संपदा अधिकारांचा कोणताही अनधिकृत वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही काँग्रेसला नम्रपणे विनंती करतो की आमच्या ब्रँडचा लोगो, पोस्टर्स आणि बॅनर काढून टाकावेत.

दुसरीकडे, नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीतही असेच पोस्टर वॉर पाहायला मिळाले होते. दक्षिणेकडील राज्यातील निवडणुकांपूर्वी (Election), काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लक्ष्य करत 'PACIM' नावाची पोस्टर मोहीम सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT