Madhya Pradesh Election: इथं निवडणुकीवेळी गोळ्या झाडल्या जातात, कमकुवत उमेदवारांनी तिकीट मागू नये; विरोधी पक्षनेत्याचे वादग्रस्त विधान

Leader Of Opposition MP: भिंडमध्ये कमकुवत उमेदवारांना आपला पक्ष तिकीट देणार नाही. गोविंद सिंह म्हणाले की, भिंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळ्या झाडल्या जातात. काँग्रेस साम-दाम-दंड-भेद घेऊन निवडणूक लढवेल.
Leader Of Opposition MP Govind Singh
Leader Of Opposition MP Govind SinghDainik Gomantak

Assembly Elections Of MP: मध्य प्रदेशमध्ये वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूंनी जोरदार भाषणबाजी सुरूच आहे. आता या दरम्यान विरोधी पक्षनेते डॉ.गोविंद सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापू शकते.

मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेते डॉ.गोविंद सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भिंडमध्ये काँग्रेस कमकुवत उमेदवारांना तिकीट देणार नाही, कारण इथे निवडणुकीत गोळ्या झाडल्या जातात, असं गोविंद सिंह यांनी म्हटलं आहे. साम, दाम, दंड आणि भेद या न्यायाने निवडणुकीची तयारी करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भिंड हा गोविंद सिंह यांचा मूळ जिल्हा आहे. शहरातील कल्चर गार्डन येथे शुक्रवारी कार्यकर्ता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याला संबोधित करताना गोविंद सिंह काय म्हणाले, राज्याच्या राजकारणात आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोविंद सिंह म्हणाले की, भिंड जिल्ह्यात निवडणुकीत गोळीबार होणे सामान्य आहे. त्यामुळे काँग्रेसही कमकुवत उमेदवारांना तिकीट देणार नाही. पक्ष सक्षम उमेदवार उभे करेल. एवढेच नाही तर कमकुवत उमेदवारांनी तिकिटासाठी प्रयत्नही करू नयेत, असेही ते म्हणाले.

गोविंद सिंह यांनी कार्यकर्त्यांना साम, दाम, दांड, भेद यासह निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. भिंड जिल्ह्याचे नेते माजी मंत्री चौधरी राकेशसिंह चतुर्वेदी, माजी आमदार हेमंत कटारे, गोहडचे आमदार मेवाराम जाटव, जिल्हाध्यक्ष मानसिंग कुशवाह यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leader Of Opposition MP Govind Singh
Election Commission: निवडणूक आयोग करणार ‘ईव्हीएम’ तपासणी

या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष त्याच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, गोविंद सिंह यांच्या या विधानामुळे भाजपला काँग्रेसवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळू शकते.

Leader Of Opposition MP Govind Singh
Pakistani Drone: बीएसएफ जवानांची मोठी कारवाई; अमृतसरमध्ये पाच किलो हेरॉईन जप्त

कोण आहेत, गोविंद सिंह?

मध्य प्रदेशातील दिग्गज नेत्यांमध्ये डॉ.गोविंद सिंग यांचे नाव कायम घेतले जाते. ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

भिंडच्या लाहार विधानसभेचे आमदार असलेल्या गोविंद सिंह यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठ्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना राजकारणाचा भरपूर अनुभव आहे, त्यामुळेचे पक्षाने त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com