Phone Hacking Row: विरोधी पक्षनेत्यांच्या फोन हॅकिंगच्या दाव्यावरुन देशात राजकारण सुरु आहे. फोन हॅकिंगच्या दाव्यावरुन काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. मात्र, विरोधकांच्या या आरोपांवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले.
विरोधी पक्षनेत्यांच्या फोनवर आलेल्या अलर्टबाबत भाजप नेते अमित मालवीय यांनी जॉर्ज सोरोस यांचे कनेक्शन शोधले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अमित मालवीय यांनी लिहिले की, 'एलन मस्क जॉर्ज सोरोस किती वाईट आहेत हे सांगतात. विशेष म्हणजे, इंडिया आघाडीशी (I.N.D.I.A.) सोरोस यांचा जवळचा संबंध आहे.'
दरम्यान, मालवीय यांनी कॉंग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते चिदंबरम यांची पोस्ट वाचून प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षांतील नेत्यांना अॅपलकडून त्यांच्या फोनवर राज्य प्रायोजित फोन हॅकिंगचा अलर्ट आला. मग हा अलर्ट फक्त विरोधी नेत्यांनाच का आला?
विरोधी पक्षातील नेत्यांचा फोन हॅक करण्यात कोणाला रस आहे? या फक्त अफवा आहेत. बोट सरकारी एजन्सीकडे दाखवले जात आहे. सध्या तो फक्त एक संशय आहे," असे मालवीय म्हणाले.
दुसरीकडे, मालवीय यांनी एका जुन्या बातमीच्या आर्टिकलचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयांमध्ये त्रुटी असल्याचे म्हटले होते. “माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयात त्रुटी असताना तुम्ही गृहमंत्री होता. चिदंबरम, हे तुमच्या लक्षात येते का?", असे म्हणत मालवीय यांनी चिंदमबरम यांच्यावर निशाणा साधला.
अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी दावा केला आहे की, त्यांना Apple कडून एक अलर्ट आला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, त्यांच्या आयफोनशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांनी फोन हॅक झाल्याचा दावा केला.
विरोधी पक्षनेत्यांच्या फोन हॅकिंगच्या दाव्याला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, अॅपलने 150 देशांमध्ये एक समान अलर्ट जारी केला आहे. केंद्र सरकार (Central Government) या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.