Supreme Court Dainik Gomantak
देश

गुजरात दंगलीत मुख्यमंत्री मोदींना मिळालेल्या क्लीन चिटविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

न्यायमूर्ती एएम खानविलकर (AM Khanwilkar) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने झाकिया जाफरी आणि एसआयटीचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर या प्रकरणी निर्णय राखून ठेवला.

दैनिक गोमन्तक

2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी (Gujarat riots 2002) राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष तपास पथकाने (SIT) दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या झाकिया जाफरी (Zakia Jafri) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर (AM Khanwilkar) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने झाकिया जाफरी आणि एसआयटीचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर या प्रकरणी निर्णय राखून ठेवला.

दरम्यान, खरे तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय याचिकेच्या गुणवत्तेवरुनच निर्णय घेणार आहे. कारण आतापर्यंत झाकिया यांनी याचिकेवर नोटीस दिलेली नाही. गुजरात सरकारच्या वतीने झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. झाकिया यांच्या याचिकेद्वारे कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) मुद्दाम हे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप गुजरात सरकारच्या वतीने करण्यात आले. गुजरात सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले होते की, याचिकाकर्त्याचे मोठे षडयंत्र आहे.

तीस्ता सेटलवाड मुद्दाम हे प्रकरण उकरुन काढतायेत

गुजरात सरकारने कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओवरही प्रश्न उपस्थित करत पैशाच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. गुजरात सरकारने म्हटले की, गरीबांच्या किंमतीवर माणूस कसा आनंद घेऊ शकतो? हा गुन्हा 2002 पासून सुरु असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले. संपूर्ण तक्रार अफवा असून अनेक आरोपी मरण पावले आहेत, साक्षीदारही गेले आहेत. तुम्ही किती दिवस या प्रकरणाला हवा देत राहणार आहात.

आरोपींशी हातमिळवणीचे स्पष्ट पुरावे : सिब्बल

झाकिया जाफरी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले होते की, जेव्हा एसआयटीसमोर हे प्रकरणे आले तेव्हा आरोपींशी हातमिळवणीचे स्पष्ट पुरावे आहेत. एसआयटीने महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली नाही. तसेच स्टिंग ऑपरेशन टेप, मोबाइल फोनही जप्त केले नाहीत. एसआयटी काही लोकांना वाचवत होती का? तक्रार करुनही गुन्हेगारांच्या नावांची नोंद घेण्यात आली नाही, यावरुन राज्याच्या यंत्रणेचे सहकार्य दिसून येते.

2002 च्या गुजरात दंगलीत गुलबर्ग हाउसिंग सोसायटी हत्याकांडात मारले गेलेले काँग्रेस आमदार एहसान जाफरी (Ehsan Jafri) यांची विधवा झाकिया जाफरी यांनी एसआयटीच्या अहवालाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एसआयटीच्या अहवालात गोध्रा हत्याकांडानंतर जातीय दंगली भडकवण्याचा राज्यातील उच्च अधिकार्‍यांचा कोणताही मोठा कट असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. 2017 मध्ये, गुजरात हायकोर्टाने SIT च्या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात केलेल्या निषेधाच्या तक्रारीला मॅजिस्ट्रेटने डिसमिस केल्याबद्दल झाकियाचे आव्हान फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT