लखीमपूर खेरी प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी

उत्तर प्रदेश सरकारने (Government of Uttar Pradesh) या प्रकरणाचा तपास अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवला आहे.
Retired Judge Pradeep Kumar Srivastava
Retired Judge Pradeep Kumar SrivastavaDainik Gomanatak
Published on
Updated on

लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथील दंगलीनंतर उफाळून आलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्वत: दखल घेतल्याने उत्तर प्रदेश सरकारनेही (Government of Uttar Pradesh) एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाचा तपास अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवला आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल (Governor Anandiben Patel) यांनी निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव (Pradeep Kumar Srivastava) यांची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. या तपासासाठी सरकारने एक सदस्यीय न्यायिक चौकशी आयोगाची स्थापना करुन अधिसूचना जारी केली आहे. यासह, तपास पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या दंगलीनंतर उसळलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. शेतकरी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. या अनुक्रमात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे (Allahabad High Court) निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांना आता लखीमपूर खेरी प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. त्यांच्या तपास पथकाचे मुख्यालय लखीमपूर खेरी येथे असेल. या समितीला दोन महिन्यांत आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे. लखनौ रेंजचे आयजी लक्ष्मी सिंह (IG Lakshmi Singh) म्हणाले की, सरकारने उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. हा आयोग प्रकरणाची चौकशी करेल आणि कार्टमध्ये आरोपपत्र दाखल करेल.

Retired Judge Pradeep Kumar Srivastava
लखीमपूर खेरी हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल; उद्या सुनावणी

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने लखीमपूर खेरी घटनेची दखल घेत गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या अजेंड्यानुसार, मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांचे त्रीसदस्यीय खंडपीठ गुरुवारी लखीमपूर खेरी हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या कारणावर सुनावणी घेणार आहे.

Retired Judge Pradeep Kumar Srivastava
लखीमपूर खिरीमध्ये नेमकं काय घडलं? काय आहे नेमकं प्रकरण?; पाहा व्हिडिओ

3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ काही शेतकरी लखीमपूर खेरी येथे मिरवणूक काढत होते. यातच भरधाव वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना आणि वाहनाच्या चालकाला मारहाण केली. या हिंसाचाराच्या घटनेत एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि इतरांविरोधात लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया कोतवाली भागात घडलेल्या घटनेत भादंविच्या कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शेतकरी नेत्यांनी सांगितले की, आशिष मिश्रा कारमध्ये होता ज्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि त्यांची हत्या केली. मात्र गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com