माजी सरन्यायाधीश 'त्या' प्रकरणाची कबुली देत म्हणाले...

भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असताना लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते.
Ranjan Gogoi
Ranjan GogoiDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश असताना लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते. याच पाश्वभूमीवर आता गोगोई यांनी बुधवारी सांगितले की, आपल्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग व्हायला नको होते. ते पुढे म्हणाले की "आपण सर्वजण चुका करतो" आणि ते कबूल करण्यात काही नुकसान नाही. ‘जस्टिस फॉर द जज’ (Justice for the Judge) या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी वादग्रस्तांसह सर्व मुद्द्यांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयातील संवेदनशील अयोध्या जमीन विवाद प्रकरणाचा अंतिम निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आला.

दरम्यान, न्यायमूर्ती गोगोई यांनी 46 वे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या कार्यकाळात अयोध्या निकालाबाबत राज्यसभा सदस्यत्वाच्या बदल्यात करण्यात आलेले आरोप फेटाळले. गोगोई यांनी एका खाजगी टीव्ही चॅनलला पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “मी खंडपीठात सामील व्हायला नको होते. (ज्याने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपाची सुनावणी केली होती). बार आणि बेंचमध्ये माझी 45 वर्षांची मेहनत वाया जात होती. मी खंडपीठाचा भाग झालो नसतो तर बरे झाले असते. आपण सर्व चुका करतो. ते स्वीकारण्यात काहीच गैर नाही."

Ranjan Gogoi
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला 2024 पर्यंत मोदी सरकारने दिली मुदतवाढ

शिवाय, 2019 मध्ये, न्यायमूर्ती गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला होता. ज्याची स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली होती. न्यायमूर्ती एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या अंतर्गत समितीने त्यांना नंतर क्लीन चिट दिली.

पुस्तकात राफेल, एनआरसी आणि इतर निर्णयांचा उल्लेख

न्यायमूर्ती गोगोई म्हणाले की, मी CJI असताना एकदाही पंतप्रधानांना भेटले नाही. ज्यांनी पंतप्रधानांसोबत 'सेल्फी' घेतले ते आता 'कार्यकर्ते' न्यायाधीश झाले आहेत. ते पुढे म्हणाले की, राफेल (लढाऊ विमान खरेदी) निकालापूर्वी पंतप्रधान जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेले होते, तेव्हा लोकांनी डाळीत काहीतरी काळे असल्याचा दावा केला होता.

Ranjan Gogoi
14 लाख लोकांना रोजगार देणाऱ्या 'PM MITRA’ योजनेला मोदी सरकारने दिली मंजूरी

तसेच ते पुढे म्हणाले, डाळ काळीच असते, नाहीतर डाळीच काय. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त पंतप्रधान आले होते. यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही. पंतप्रधानांसोबत सेल्फी घेणारे न्यायाधीश होतात. आणि आता ते कार्यकर्ता न्यायाधीश, असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

तसेच, त्यांच्या पुस्तकात, गोगोई यांनी त्यांच्या जीवनातील नाट्यमय कथा, आसाममधील दिब्रुगढ ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असा त्यांचा प्रवास, ऐतिहासिक खटले आणि न्यायालयीन महत्त्वाकांक्षा याविषयी वर्णन केले आहे. देशाच्या कायदेशीर व्यवस्थेबद्दल शिकलेले धडेही त्यांनी उघड केले आहेत. त्यात राफेल, राहुल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) सुरु झालेल्या अवमानाच्या कारवाई, सबरीमाला, एनआरसी आणि अयोध्यावरील निर्णयांचेही उल्लेखही केला आहे. गोगोई 3 ऑक्टोबर 2018 ते 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत भारताचे 46 वे सरन्यायाधीश होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com