Supreme Court of India Dainik Gomantak
देश

कुरानमधील 26 आयत रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका

वसीम रिझवी यांनी कुरान (Quran) बद्दल दाखल केलेल्या या याचिकेमुळे मुस्लीम (Muslim) समाजात नाराजी असल्याचे दिसुन येते आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तरप्रेदेशच्या (Uttar Pradesh) सिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी (Vasim Rizavi) यांनी कुरान मधुन 26 आयत/ श्लोक काढुन टाकण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलीली याचिका फेटाळुन लावण्यात आली होती. मात्र आता त्यांनी याबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यासोबतच त्यांच्यावर लावण्यात आलेल्या 50 हजार रुपयांचा दंड माफ करण्याची याचिका मागे घेतली आहे.

कुरानच्या 26 आयत काढुन टाकण्याची रिझवी यांची याचिका कोर्टाने फेटाळुन लावली तसेच त्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर रिझवी यांनी सुप्रीम कोर्टाने 12 एप्रिलच्या आदेशावर पुनर्विचार केला पाहिजे, कोर्टाने अत्यंत महत्वपुर्ण विषयाकडे दुर्लक्ष केल असल्याचे मत व्यक्त केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असुनदेखील कोर्टाने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले असेही ते म्हणाले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या याचिकेला तुच्छ याचिका म्हटले होते. मात्र रिझवी यांनी कुराणच्या त्या 26 आयत दहशतवादाला पोषक असल्याचे म्हणत, कुराण मधुन त्या आयत काढून टाकण्याची मागणी केली होती. या आयतांमध्ये मुस्लिम नसलेल्या लोकांविरुद्ध हिंसा आणि त्यांची हत्या करण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या गोष्टी आहेत. मदरशांमध्ये या आयत शिकवल्या जातात, त्यामुळे यांच्यावर बंदी आणली पाहीजे अशी मागणी केली होती.

रिझवी यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत जेव्हापासुन आपण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, तेव्हा पासुन आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगितले आहे. तर रिझवी यांच्या या याचिकेमुळे मुस्लीम समाजात देखील नाराजी असल्याचे दिसुन येते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT