मोहन भागवतांच्या "मॉब लिंचींगच्या वक्तव्यावर" ओवैसींची प्रतिक्रीया

AIMIM पक्षाचे प्रमुख असद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत मोहन भागवतांच्या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळते आहे.
AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat
AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गौरक्षेच्या मुद्दयावरुन मॉब लिंचिंग करणारे लोक हिंदु विरोधी असुन, मुस्लीमांन या देशात राहु शकत नाही असे वाटत असणारे लोक हिंदु नाहीत, तर भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच असल्याचे विधान केले आहे. यावर प्रतिक्रीया देताना AIMIM पक्षाचे प्रमुख असद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळते आहे. (Asaduddin owaisi Owaisi's reaction to Mohan Bhagwat's "mob lynching statement.")

असदुद्दीन ओवैसी यावर बोलतान म्हणाले की,”मोहन भागवत म्हणताय लिंचिंग करणारे हिंदु विरोधी आहेत, त्यांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक समजत नसेल, मात्र हत्या करताना त्यांना अखलाख, पहलू, रकबर, अलीमुद्दीन यांचे नाव पुरेसे होते. हा द्वेष हिंदुत्वाची देन असुन या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचा पाठींबा आहे.”

AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat
जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूका होणार ?

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, अखलाकच्या मारेकऱ्यांच्या शरीरावर तिरंगा ठेवण्यात आला, आसिफाला ठार मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ एक महापंचायत आयोजित केली गेली, जिथे भाजप प्रवक्ते विचारतात की "आम्ही मारू शकत नाही काय?" तिसर्‍या ट्विटमध्ये ते म्हणाले की कायरपणा, हिंसाचार आणि हत्या गोडसे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा अविभाज्य भाग आहेत. मुस्लिमांची लिंचिंग देखील याच विचारसरणीचा परिणाम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com