Paytm CEO: अर्थविश्वात paytm हे एक नावाजलेले पैसे पाठवण्यासाठीचे अॅप आहे. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांच्यावर डीसीपीच्या वाहनाला कार धडकवल्याचा आरोप आहे. मात्र शर्मा यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली होती.
फेब्रुवारी महिन्यात विजय शेखर शर्मा यांना आयपीसी कलम 279 अंतर्गत अटक करण्यात आली होती. वास्तविक, पेटीएमच्या संस्थापकावर दक्षिण दिल्लीच्या डीसीपी यांच्या कारला धडक दिल्याचा आरोप आहे. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma hits DCP's car)
ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली आणि डीसीपी बेनिता मेरी जॅकर यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल दीपक कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तर, प्राप्त माहितीनुसार अरबिंदो मार्गावरील मदर्स इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर पेटीएम संस्थापकाच्या जग्वार लँड रोव्हरने डीसीपीच्या वाहनाला धडक दिली होती.
दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी पुष्टी केली की पोलिसांनी “शर्माला अटक केली आणि जामिनावर सोडले”. डीसीपी जैकर यांनी याप्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.