गोवा : विधानसभेचे विशेष अधिवेशन 15 मार्चला

हंगामी सभापती गणेश गावकर यांची नियुक्ती
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : येत्या मंगळवारी 15 मार्चला राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन सकाळी 11.30 वाजता बोलावले आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्चला संपत आहे. त्यापूर्वी हे अधिवेशन घेणे आवश्‍यक आहे. या अधिवेशनासाठी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची हंगामी सभापतीपदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भातची माहिती राजपालांचे सचिव मिहिर वर्धन यांनी दिली आहे. (Special session of Goa Legislative Assembly on 15th March)

Goa Assembly
Mopa Link Road : उड्डाण रस्त्यासाठी जमीन टेस्टिंग

दरम्यान, अधिवेशनाच्या हंगामी सभापतीपदी (Speaker) गणेश गावकर यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना उद्या सोमवार 14 मार्चला सकाळी 11.30 वाजता राजभवन (Raj Bhavan) येथे शपथ दिली जाणार आहे. या सभापतींसमोर विधानसभेत नवनिर्वाचित आमदार (MLA) शपथ घेणार आहेत. घटनेच्या कलम 188 नुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे, असे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन विधानसभा बरखास्तीचा ठराव घेतला होता व तो राज्यपालांना सादर केला होता. त्यानुसार राज्यपालांनी (Governor) विधानसभा (Legislative Assembly) विसर्जित करून पुढील सरकार स्थापनेपर्यंत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना काळजीवाहू सरकारचा पदभार सुपूर्द केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com