Military Personnel Dainik Gomantak
देश

पठाणकोट: लष्करी जवानाने साथीदारांवर झाडल्या गोळ्या, दोन ठार

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणीत लष्कराच्या एका जवानाने सोमवारी आपल्या दोन साथीदारांची गोळ्या झाडून हत्या केली.

दैनिक गोमन्तक

Pathankot: पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणीत लष्कराच्या एका जवानाने सोमवारी आपल्या दोन साथीदारांची गोळ्या झाडून हत्या केली. 22 वर्षीय हवालदाराने सोमवारी पहाटे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील दोन हवालदारांवर गोळ्या झाडल्या, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चार वर्षांपासून सैन्यात कार्यरत असलेला आरोपी सैनिक आपले शस्त्र सोडून घटनास्थळावरुन पळून गेला होता, परंतु नंतर त्याला पकडण्यात आले. (pathankot army jawan opened fire on his own comrades in mirthal cantonment two killed)

दरम्यान, गोळीबार कशामुळे झाला हे जाणून घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. नायक दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, झोपेत असताना आपल्याला गोळ्यांचा आवाज आला. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह ताबडतोब त्याच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. जखमींना पठाणकोट येथील रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तसेच, पोलिस (Police) आणि लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरु केली. दुसरीकडे, आरोपीला कॅन्टोन्मेंटपासून काही किलोमीटर अंतरावर पकडण्यात आले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT