UN मध्ये पाक चा पर्दाफाश, 'मुंबई, पठाणकोट अन् पुलवामातील गुन्हेगारांना देतोय संरक्षण'

पाकिस्तान (Pakistan) दहशतवाद्यांना आश्रय देतो हे, अवघ्या जगाला ज्ञात आहे. भारतातील काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या माध्यमातून अतंकवादी कारवाया पाकिस्तान सातत्याने करत आला आहे.
 United Nations
United NationsDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे, अवघ्या जगाला ज्ञात आहे. भारतातील काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या माध्यमातून अतंकवादी कारवाया पाकिस्तान सातत्याने करत आला आहे. आणि विशेष म्हणजे भारताने देखील तेवढ्याच ताकदीने पाकिस्तानला (Pakistan) जशाच तसे उत्तरही दिले आहे. (India Has Said In The United Nations That Pakistan Is Protecting Terrorists)

याच पाश्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर हल्लाबोल करताना भारताने म्हटले आहे की, '2008 च्या मुंबई, 2016 पठाणकोट आणि 2019 च्या पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यांचे गुन्हेगारांना कोणता देश सरंक्षण देतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. या भ्याड कृत्यांचे गुन्हेगार पाकिस्तानचे आश्रय आणि आदरातिथ्य उपभोगत असून हे अत्यंत खेदजनक आहे.' संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मिशनचे काउंसलर राजेश परिहार यांनी सोमवारी सांगितले की, ''बरोबर तीन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) भ्याड दहशतवादी हल्ल्यात 40 शूर भारतीय सुरक्षा जवान शहीद झाले होते.''

 United Nations
'16 फेब्रुवारी हा रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याचा दिवस असेल': व्लोदिमीर झेलेन्स्की

दरम्यान, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सदस्य देशांसोबत दहशतवाद विरोधी समितीच्या (CTED) कार्यकारी संचालनालयाच्या कामावर खुल्या चर्चेदरम्यान भारताचे राष्ट्रीय उत्तर देताना परिहार म्हणाले, "जगाने मुंबई, पठाणकोटची (Pathankot) भीषणता पाहिली आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यांचे हल्लेखोर कुठून आले हे आपल्या सर्वांना माहीत आहे.'' पाकिस्तानचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले की, ''या हल्ल्यातील पीडितांना अद्याप न्याय मिळाला नाही हे दुःखद आहे. हे हल्लेखोर, मदतनीस आणि पैसे पुरवणारे अजूनही मोकळे फिरत आहेत.''

परिहार पुढे म्हणाले की, ''संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या 150 संघटना आणि व्यक्तींशी संबंध असलेल्या दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान हे सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांचे नेते अनेकदा दहशतवाद्यांवर स्तुतीसुमने उधळत असतात. पुढे जात ते त्यांना शहीद देखील घोषित करतात. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेनला शहीद म्हटले होते.'' या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे, यावर परिहार यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या या देशाला त्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांविरुद्ध तात्काळ प्रभावी, विश्वासार्ह, पडताळणीयोग्य आणि योग्य ती कारवाई करण्याची हीच वेळ आहे.

 United Nations
रशिया युक्रेनमध्ये होऊ शकते 'युद्ध'! राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की म्हणाले....

तसेच, दहशतवादाविरुद्धच्या सामूहिक जागतिक लढ्यात भारत आघाडीवर असून 'झिरो टॉलरन्स'च्या धोरणावर काम करत आहे. तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations Security Council) दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्ष आणि भारतीय मिशनचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी.एस तिरुमूर्ती यांनी पुलवामा आणि श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यांचे स्मरण करत सांगितले की, आयएसआयएल, अल कायदा (Al Qaeda) आणि संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेले दहशतवादी गट आणि एक देश विशेषत: नियंत्रित दहशतवादी नागरिक आणि लष्करी इमारतींना लक्ष्य करत आहेत.

दहशतवाद्यांवर योग्य ती कारवाई करणार

राजेश परिहार पुढे म्हणाले की, जगाने दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरण्याची गरज आहे. पाकिस्तानचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले की, त्यांनी स्वत:ला दहशतवादी कारवायांचा पीडित म्हणून घोषित केले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. "आम्हाला आशा आहे की, दहशतवाद विरोधी समिती, CTED आणि विश्लेषणात्मक समर्थन आणि प्रतिबंध मॉनिटरिंग टीम अल कायदा, लष्कर आणि जैशसह धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात दहशतवादी गटांच्या छळावर लक्ष देतील,"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com