Railway Platform Hanuman Chalisa Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: नमाज अदा करणाऱ्या लोकांसमोर प्रवाशांनी सुरु केले हनुमान चालिसाचे पठण; प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ व्हायरल

Railway Platform Hanuman Chalisa Viral Video: सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यावरुन अनेक वाद झाले आहेत. नमाज अदा करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

Railway Platform Hanuman Chalisa Viral Video: सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यावरुन अनेक वाद झाले आहेत. नमाज अदा करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. काही लोक नमाजच्या निषेधार्थ हनुमान चालिसाचे पठण करु लागतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर नमाज अदा करणाऱ्या लोकांसमोर हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात केली. हा व्हायरल व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही, तसेच व्हिडीओची पुष्टीही झालेली नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दरम्यान, प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन उभी असून काही लोक तिथे नमाज अदा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, तिथे बसलेल्या काही तरुणांनी हनुमान चालिसाचे पठण सुरु केले. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक स्वेटर घालून बसलेले दिसत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ अलीकडच्या दिवसातील असण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ शेअर करुन काही लोक याला नमाज अदा करणाऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण सुरु करण्यात आल्याचे सांगत आहेत.

एकाने लिहिले की, काही मुस्लीम तरुण रेल्वे स्टेशनच्या बाजूला कोणालाही त्रास न देता नमाज अदा करत आहेत. मग काही मुस्लिम विरोधी हिंदूंनी त्यांच्या धार्मिक श्रद्धा जागृत केल्या आणि प्रार्थनेत अडथळा निर्माण करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण सुरु केले. तर दुसऱ्याने लिहिले की, काही मुस्लिम लोक रेल्वे स्टेशनवर नमाज अदा करत होते, आमच्या हिंदू बांधवांनीही यावेळी हनुमान चालीसा सुरु केली, माझा देश बदलत आहे.

एकाने लिहिले की, यापेक्षा चांगले काय असू शकते की दोन्ही धर्माचे लोक एकमेकांना इजा न पोहोचवता शेजारी बसून देवाचे आणि अल्लाहचे स्मरण करत आहेत. एकाने लिहिले की, कोणत्याही धर्माच्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी असे पठण आणि नमाज अदा करु नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT