Larvae found in sandwich on Delhi-Mumbai flight, FSSAI serves show-cause notice to Indigo:
देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोला FSSAI कडून फ्लाइटमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये अळ्या आढल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे.
ही नोटीस दिल्ली ते मुंबईच्या फ्लाइटमध्ये देण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या संदर्भात जारी करण्यात आली आहे.
एएनआयच्या बातमीनुसार, इंडिगोने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला FSSAI कडून दिल्ली ते मुंबई या फ्लाइट क्रमांक 6E 6107 वर दिलेल्या खाद्यपदार्थाबाबत कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. आम्ही प्रोटोकॉलनुसार नोटीसला उत्तर देऊ.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीस्थित आहारतज्ज्ञाच्या तक्रारीवरून एअरलाइनला ही नोटीस बजावण्यात आली आहे. २९ डिसेंबर रोजी दिल्ली त्यांच्या मुंबई या विमान प्रवासादरम्यान इंडिगोच्या कर्मचार्यांनी दिलेल्या सँडविचमध्ये अळ्या आढळल्याचा आरोप या महिला प्रवाशाने केला होता.
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 6107 मध्ये गेल्या शुक्रवारी ही घटना घडली. लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, खुशबू गुप्ता नावाच्या महिला प्रवाशाने फ्लाइटमधील सँडविचमधील अळ्यांचा एक छोटासा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये या प्रवाशी महिलेने विमान कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले होते.
या महिलेने असेही सांगितले की, केबिन क्रूला सँडविचमध्ये अळ्या असल्याची माहिती देऊनही त्यांनी इतर प्रवाशांना सँडविच वाटणे सुरूच ठेवले.
एअरलाइन्स कर्मचार्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले आहे आणि एखाद्याला संसर्ग झाल्यास कोणाला जबाबदार धरले जाईल, असा सवालही या महिला प्रवाशाने उपस्थित केला आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच इंडिगोने माफी मागितली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.
वृत्तसंस्था पीटीआयने इंडिगोच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन सांगितले की, एअरलाइनला त्यांच्या एका ग्राहकाने दिल्ली ते मुंबई या फ्लाइट 6E 6107 च्या अनुभवाबाबत उपस्थित केलेल्या चिंतेची जाणीव आहे.
विमान कंपनीने म्हटले आहे की, आम्ही विमानातील अन्न आणि पेय सेवेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी आमच्या अटूट बांधिलकीवर जोर देऊ इच्छितो.
इंडिगोचे म्हणणे आहे की, चौकशी केल्यावर, आमच्या क्रूने ताबडतोब संबंधित सँडविचची सेवा बंद केली. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. योग्य सुधारात्मक उपाय केले जातील याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या केटरर्ससोबत काम करत आहोत. यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.