Bus Accident Dainik gomantak
देश

बस अपघाताने उत्तरकाशी हादरली; दुर्घटनेत 22 प्रवाशांचा मृत्यू

अपघातग्रस्त बस सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळली

दैनिक गोमन्तक

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात उत्तरकाशी - यमनोत्री महामार्ग परिसरात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात भाविकांना घेऊन जाणारी एक मिनीबस दरीत 200 मीटर खोल कोसळली आहे. यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. (Passengers bus accident in Uttarkashi, 22 people died )

घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून तातडीने सुरु केली आहे. मदत कार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. मात्र संबंधित परिसर हा घाट परिसर दरडीचा भाग असल्याने रेस्क्यू करण थोडे कठीण जात असल्याची देखील माहिती स्थानिकांनी दिली आहे. डीजीपी अशोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार घटना स्थळी तातडीने पोलीस तसेच एसडीआरएफची टीम दाखल झालेली आहे. यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 28 ते 29 जण होते. यांच्यापैकी बहुतेकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 जखमींना रेस्क्यू करण्यात आले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह सापडले आहे. तर इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे. बसमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तसेच घटनास्थळी तीन रुग्णवाहिका ही दाखल झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT