Pakistani Citizens
Pakistani Citizens  Twitter/ @ANI
देश

कोरोनामुळे भारतात अडकलेले पाकिस्तानी नागरिक अखेर मायदेशी परतले

दैनिक गोमन्तक

कोरोना काळात (Covid 19) भारतात (India) अडकलेले 190 पाकिस्तानी नागरिक (Pakistani Citizens) रविवारी अटारी-वाघा सीमेवरुन (Attari-Wagah Border) आपल्या घरांसाठी अखेर रवाना झाले आहेत. हे सर्व पाकिस्तानी नागरिक भारताच्या विविध राज्यांमध्ये मंदिरे आणि गुरुद्वारांना भेट देण्यासाठी आले होते. या सर्व पाकिस्तानी नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना देशात परतण्यापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. काही पाकिस्तानी नागरिकांनी सांगितले की, एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर ते घरी परतत असल्यामुळे आनंदी दिसत आहेत.

पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांताचे (Sindh Province) रहिवासी कांजी राम यांनी सर्व शक्य मदतीसाठी भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच भारत सरकारने त्यांना मोफत अन्न, औषधे, वैद्यकीय उपचार आणि निवाऱ्याबरोबर त्यांना प्रवासाची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मदत केली. यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानने कोरोनामुळे भारतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत घेण्यास नकार दिला होता. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अडकलेल्या लोकांच्या व्हिसाची मुदत संपल्यामुळे त्यांना अटारी-वाघा सीमेद्वारे पाकिस्तानला जावे लागले. पाकिस्तान सरकारने स्वतःच्या लोकांना पाकिस्तानात प्रवेश देण्यास नकार दिला होता. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तान सरकारने त्यावर बंदी घातली होती.

यावर्षी जून महिन्यात 300 हून अधिक भारतीय पाकिस्तानातून परतले

यावर्षी जूनच्या सुरुवातीला, कोरोना महामारीमुळे लादलेल्या निर्बंधांमुळे काही महिने पाकिस्तानात अडकल्यानंतर अमृतसरमधील (Amritsar) वाघा-अटारी सीमेवरून 300 हून अधिक भारतीय भारतात परतले. विद्यार्थी, दीर्घकालीन व्हिसा धारक, त्यांचे नातेवाईक आणि वैध व्हिसासह 50 पाकिस्तानी नागरिकांसह 360 भारतीय नागरिकांची एक तुकडी पंजाबमध्ये दाखल झाली.

त्याच वेळी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 107 पाकिस्तानी नागरिक आणि 88 NORI व्हिसाधारक, 75 भारतीय आणि NORI व्हिसाधारकांच्या 7 जोडीदारांना पाकिस्तानातून भारतात परत आणण्यात आले. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या वर्षी मार्चमध्ये ही सुविधा बंद करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT