पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये घेणार तालिबान्यांची मदत

काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय लष्करासमोर (Indian Army) लढण्यासाठी तालिबान्यांना (Taliban) उभे करण्याच्या कट पाकिस्तान (Pakistan) रचत असल्याची माहिती समोर येत आहे.
Pakistan will take support of Talibanis in Jammu & Kashmir
Pakistan will take support of Talibanis in Jammu & KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय लष्करासमोर (Indian Army) लढण्यासाठी तालिबान्यांना (Taliban) उभे करण्याच्या कट पाकिस्तान (Pakistan) रचत असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांचा सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या एका नेत्याने सांगितले की, पाकिस्तान सरकार काश्मीरमध्ये तालिबानची मदत घेण्याबाबत चर्चा करत आहे.(Pakistan will take support of Talibanis in Jammu & Kashmir)

पाकिस्तानच्या सत्ताधारी पीटीआयच्या नेत्याचे विधान -

तालिबानने काश्मीरमध्ये पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याची घोषणा केली असल्याची माहिती एका टीव्ही न्यूजच्या चर्चेत पीटीआय नेत्या नीलम इर्शाद शेख यांनी दिली आहे. पाकिस्तानमध्ये प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की ' तालिबान म्हणते की ते आमच्यासोबत आहेत आणि काश्मीरमध्ये आम्हाला मदत करतील'. मात्र, यापूर्वी तालिबानने म्हटले होते की काश्मीर हा भारताचा अंतर्गत आणि द्विपक्षीय मुद्दा आहे.

Pakistan will take support of Talibanis in Jammu & Kashmir
अमेरिका-तालिबान यांच्यात पडद्यामागे शिजतेय 'खिचडी'; सीआयए प्रमुखांची गुप्त वार्ता

त्याच बरोबर त्यांनी आपले भाषण चालू ठेवले आणि सांगितले की तालिबान आम्हाला मदत करेल कारण त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली गेली आहे. यापूर्वी, पदच्युत अफगाणिस्तान सरकारने तालिबानच्या विजयात पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआयचा मोठा हात असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या आठवड्यात ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराणला भेट देऊन अफगाणिस्तानच्या समस्येवर चर्चा करतील. मंगळवारी ही माहिती देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले की ते अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर पाकिस्तानची भूमिका घेतील असे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com