"भारत-पाकिस्तान सीमेवर लढा,आम्हाला दूर ठेवा'' तालिबानचं मोठं वक्तव्य

काबूलमधील तालिबान सरकारच्या (Taliban Government) अंतर्गत स्टॅनिकझाई परराष्ट्र व्यवहार हाताळत असल्याचे मानले जाते.
Sher Mohammad Abbas Stanikzai
Sher Mohammad Abbas StanikzaiDainik Gomantak

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून टाकल्यानंतर आपली सत्ता स्थापनेस सुरुवात केली आहे. यातच आता तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई (Sher Mohammad Abbas Stanikzai) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठे विधान केले आहे. भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादामध्ये अफगाणिस्तानचा वापर करु नये, असे स्टेनिकझाई म्हणाले आहेत. काबूलमधील तालिबान सरकारच्या (Taliban Government) अंतर्गत स्टॅनिकझाई परराष्ट्र व्यवहार हाताळत असल्याचे मानले जाते. माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये, स्टॅनिकझाई म्हणाले की, तालिबानला त्याच्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत.

Sher Mohammad Abbas Stanikzai
काबूलमध्ये अमेरिकेचा पुन्हा Airstrike, इसिसचा मोठा कट उधळला

तालिबान सरकारचे भारताबद्दल पूर्ववैमनस्यपूर्ण शत्रुत्व किंवा पाकिस्तानच्या संगनमताने भारताला लक्ष्य करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, स्टनिकझाई म्हणाले की, "प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या काही बातम्या चुकीच्या आहेत." आम्ही असे विधान कधीही केले नाही आणि असे कोणतेही संकेत आमच्या बाजूकडून देण्यात आले नाहीत. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत.

तालिबानी नेत्याने पुढे सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळ सुरु असलेल्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाल पूर्णपणे जाणीव आहे, परंतु तालिबानला आशा आहे की, अफगाणिस्तानचा वापर दोन्ही देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये होणार नाही. "असे स्टानिकझाई म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोठा सीमावाद आहे. दोन्ही देश त्यांच्या सीमेवर लढू शकतात. परंतु, त्यांनी यासाठी अफगाणिस्तानचा वापर करु नये आणि आम्ही कोणत्याही देशाला यासाठी आपल्या भूमीचा वापर देणार नाही.

Sher Mohammad Abbas Stanikzai
काबूलमध्ये पुन्हा मोठा स्फोट; जो बायडेन यांचा अंदाज ठरला खरा

तत्पूर्वी, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन (Suhail Shaheen) म्हणाले होते की, तालिबानला अफगाणिस्तानमधील भारताच्या विकास प्रकल्पाबाबत कधीच तक्रार नव्हती, पण तालिबानने भारताचा विरोध केला कारण नवी दिल्लीने काबूलच्या अश्रफ घनी सरकारला पाठिंबा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com