Pakistani Actress Nazia Sanam Video Dainik Gomantak
देश

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Nazia Sanam Viral Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या व्हिडिओने दोन्ही देशांतील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sameer Amunekar

सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या व्हिडिओने दोन्ही देशांतील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. नाझिया सनम (Nazia Sanam) नावाच्या या अभिनेत्रीने भारतीय विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर तिच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींचे वेडे असतात," अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडिओ पोस्ट केला असून, यामुळे इंटरनेटवर शिष्टाचार आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा रंगली आहे.

नेमका काय आहे हा व्हिडिओ?

नाझिया सनमने आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने इमिग्रेशन ऑफिसरसोबत झालेल्या संभाषणाचा दावा केला आहे. नाझियाच्या मते, जेव्हा ती काउंटरवर पोहोचली, तेव्हा तिथे तैनात असलेल्या भारतीय अधिकाऱ्याने तिच्याशी अतिशय खेळीमेळीच्या आणि गप्पांच्या सुरात संवाद साधला.

जेव्हा त्या अधिकाऱ्याला समजले की नाझिया कराचीहून आली आहे, तेव्हा त्याने चक्क उर्दूमध्ये बोलायला सुरुवात केली, असा दावा तिने या व्हिडिओत केला आहे.

इमिग्रेशन ऑफिसरची 'फ्लर्टिंग' की केवळ विनोद?

नाझियाने व्हिडिओत पुढे सांगितले की, अधिकाऱ्याने तिच्या पेहरावावरून ती केबिन क्रू आहे का, अशी विचारणा केली. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा तो अधिकारी गंमतीने म्हणाला, "जोपर्यंत तू काय करतेस हे सांगत नाहीस, तोपर्यंत मी तुला इथेच थांबवून ठेवेन." अधिकाऱ्याने तिला "तू काहीतरी खास आहेस," असे म्हटल्याचा दावाही नाझियाने केला आहे. नाझियाने या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन अतिशय हलक्या-फुलक्या पद्धतीने केले असून भारतीय पुरुषांच्या स्वभावावर भाष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT