Goa Politics: '2027 ची विधानसभा निवडणूक हे युद्धच, तयारीला लागा'! दामू नाईकांचे कार्यकर्त्यांना आवाहन; प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती

Goa Assembly Election 2027: विधानसभा निवडणूक ही मोठी परीक्षा व एका परीने युद्धच असल्याने कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागणे गरजेचे आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मडगावात सांगितले.
Damu Naik Goa BJP
Goa BJP State President Damu NaikDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: विधानसभा निवडणूक केवळ १२ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. २०२२ मध्ये १४ फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. त्यामुळे मार्च-एप्रिल २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक शक्य आहे. १२ महिने असेच लोटतील. या निवडणुकीपूर्वी इतर निवडणुका आहेतच, पण विधानसभा निवडणूक ही मोठी परीक्षा व एका परीने युद्धच असल्याने कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागणे गरजेचे आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मडगावात सांगितले.

ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या दक्षिण गोवा समितीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा ते बोलत होते. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, सचिव शर्मंद पै रायतुरकर, फातोर्डा भाजप मंडळ अध्यक्ष तथा नगरसेविका श्वेता लोटलीकर, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, नगरसेवक सदानंद नाईक, मिलाग्रीन गोम्स व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण गेले दोन वर्षे गोव्यात भाजपचा रथ यशस्वीपणे हाकला, याचे श्रेय आपण मुख्यमंत्री, इतर मंत्री, आमदार, प्रदेश समितीतील व दक्षिण, उत्तर गोवा समितीतील पदाधिकारी, सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांना देतो, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे कार्यकर्ते वर्षभर काही ना काही कामानिमित्त लोकांच्या संपर्कात असतात. इतर पक्ष केवळ निवडणुका जवळ आल्या की लोक संपर्क करतात, हाच फरक आहे,असे त्यांनी सांगितले.

Damu Naik Goa BJP
Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

प्रभाकर गावकर यांनी स्वागत केले. जिल्हा पंचायत निवडणुकीतील पक्षाचे यश अतुलनीय आहे, असेही त्यांनी सांगितले. शर्मंद रायतुरकर म्हणाले की, पक्ष वाढीसाठी नेतृत्वाचा दृष्टिकोन जबाबदार असतो. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असू शकतात. पण मनभेद न होऊ नयेत, यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कचेरीत असंख्य कार्यकर्त्यांनी दामू नाईक यांना शुभेच्छा दिल्या.

Damu Naik Goa BJP
Damu Naik: 'प्रेम असते, तेथेच भांडण असते'! तवडकर- गावडे विषयावरती दामूंची प्रतिक्रिया; वाद संपल्याचा केला दावा

फोंडा पोटनिवडणूक आव्हान!

आगामी नगरपालिका तसेच फोंडा पोट निवडणूक हे मोठे आव्हान आहे. आम्हाला खाली खेचण्यासाठी कित्येकजण तयारीत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे हा आपला प्रयत्न आहे, असेही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com