Bharat Jodo Yatra Dainik Gomantak
देश

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा? भाजप आक्रमक

भारत जोडो यात्रेतून एक नवा वाद समोर आला आहे.

Pramod Yadav

Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये पोहचली आहे. मध्यप्रदेश येथील खारखोन या ठिकणी यात्रा पोहचली असून, यात्रेतून एक नवा वाद समोर आला आहे. राहूल गांधींच्या यात्रेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यावरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यासह सर्व भाजप आक्रमक झाली आहे.

('Pakistan zindabad' slogan raised during Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra, alleges BJP)

मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी याबाबत ट्विट करत या प्रकरणाची दखल घेतली असून, दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

"भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले. ही भारत जोडो यात्रा आहे का? भारत तोडणाऱ्यांना एकत्र करण्याची यात्रा? याआधीही भारत तोडला आहे, पुन्हा भारत तोडण्याचा विचार आहे का? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."

भाजपच्या आयटी विभागाचे इनचार्ज अमित मालवीय (Amit Malviya) यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने जाहीररित्या राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त केल्यानंतर, भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. एका काँग्रेस खासदाराने हा व्हिडिओ टाकला होता पण, नंतर त्याने तो डिलिट केला. हेच काँग्रेसचे सत्य आहे. असे ट्विट अमित मालवीय यांनी केले आहे.

दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि काँग्रेसची याबाबत भूमिका यावर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेश राज्यात पोहचली आहे. बारा दिवसांचा प्रवास करून ही यात्रा पुढे जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT